22 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

संमेलनातून अनेक कवी आणि साहित्यिक घडतील : विनोदजी बोधले ( जिल्हाध्यक्ष नाशिक )

संमेलनातून अनेक कवी आणि साहित्यिक घडतील : विनोदजी बोधले ( जिल्हाध्यक्ष नाशिक )

 

संमेलनातून अनेक कवी आणि साहित्यिक घडतील : विनोदजी बोधले ( जिल्हाध्यक्ष नाशिक )

 

 

बीड : बातमीपत्र

संमेलन हे साहिऱ्याकांसाठी पर्वणीच असून याचा मुख्य उद्देश हा साहित्याचे आणि विचारांचे आदान प्रदान होणे हा आहे, संमेलनातून नवनवीन कवी , साहित्यिकआणि सुजाण नागरिक घडेल आणि त्यातून सामजिक सलोखा सामाजिक ऐक्य अबाधित राहून समाजाच्या उज्वल परंपरेस पुढे नेतील, वंजारी समाजाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक व नवयुगाचा आरंभ करणारे होईल, त्याचबरोबर युवा पिढीसाठी हे संमेलन नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास विनोद बोधले नाशिक जिल्हाध्यक्ष वंजारी महासंघ, यांनी व्यक्त केला आहे.

ज्येष्ठांबरोबरच नवी पिढीदेखील, वंजारी महासंघाच्या साहीत्य विषयक विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहे, युवापिढीत प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे. कलात्मकता आणि सर्जनशीलताही आहे. शिक्षणापासून विज्ञान-तंत्रज्ञान, कला, क्रीडा, समाजसेवा व राजकारणातही तरुण पिढी यशाला गवसणी घालू पाहते आहे. आणि या वंजारी महासंघाने आयोजित केलेले दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक तर असणारच आहे त्याच बरोबर युवापिढीची प्रेरणादायी ठरेल यात कुठलीच शंका नाही असेही विनोद बोधले म्हणाले

सदरील संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीसाठी सृजनशीलता वृद्धिंगतते बरोबरच, नवनवीन साहित्य विषयक माहिती आत्मसात करून त्याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार कसा करता येईल यासाठीची एक मोठी संधी चालून आलेली आहे,

सन डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक येथे जेष्ठ साहित्यीक प्रा.वा.ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली वंजारी समाजाचे पाहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. याच वेळी साहित्य व सामाजिक संस्कृतीला बळकटी मिळाली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात संमेलन झाली पाहिजेत आणि त्यासाठी द्विवार्षिक संमेलन हि पंरपरा निर्माण करण्याचा निर्णय झाला होता. आणि याच निर्णयांच्या अनुषंगाने २५ ऑगस्ट २०२४ रविवार या दिवशी गंगा लान्स, संत भगवानबाबा चौक, निर्मल नगर, अहिल्यानगर येथे वंजारी महासंघाचे हे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी मावळते संमेलनाध्यक्ष प्रा.वा.ना आंधळे सर यांनी नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा.डॉ.सांगिता घुगे यांची संमेलन अध्यक्षपदी निवड घोषित केली असून उद्घाटक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ गजनान सानप हे असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अहिल्यानगरचे पालकमंत्री मा श्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार मा श्री निलेशजी लंके, माजी खासदार मा श्री सुजय विखे, नगरचे आमदार मा श्री संग्राम भैय्या जगताप, शिर्डी चे खासदार मा श्री भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार मा श्री सदाशिवराव लोंखडे, संगमनेर चे आमदार मा मंत्री मा बाळासाहेब थोरात, राहुरीचे आमदार मा श्री प्राजक्ता तनपुरे, शेवगाव पाथर्डी च्या आमदार मा मोनिका ताई राजळे, जामखेड कर्जत चे आमदार मा श्री रोहितजी पवार, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक मा श्री गणेशजी खाडे, उद्योगपती मा श्री बुधाजीराव पानसरे, राज्याच्या वेगवेगळ्या भागातील साहित्यिक यांच्यासह अनेक मान्यवर व साहित्य आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचे मावळते अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष यांना पदभार देतील. स्थानिक पातळीवर स्वागत समितीचे पदाधिकारी लवकरच सर्वांना निमंत्रण देतील अशी माहिती स्वागताध्यक्ष अंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राजकुमार आघाव, सह-स्वागताध्यक्ष रेणुका वराडे, सह-स्वागताध्यक्ष घनश्याम बोडखे यांनी दिली आहे. सदर संमेलन आयोजित करून सामाजिक समता निर्माण व्हावी यासाठी ऐतिहासिक पाऊल म्हणून याच संमेलनात सामाजिक समतेचे बीजारोपण करण्यात येईल त्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील साहित्यिक यांना देखील गौरविण्यात येणार आहे.

सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील गावागावांतील समाज बांधवांपर्यंत संमेलनाचे निमंत्रण दिले जाईल. त्या सोबत अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील इतिहासात नोंद होईल असं संमेलन आयोजित करून यशस्वी करू असं मत विनोद बोधले नाशिक जिल्हाध्यक्ष वंजारी महासंघ यांनी व्यक्त केले आहे.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या