19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

केळूसकर गुरुजी सारखे आदर्श शिक्षक लाभले तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महामानव घडतात-चेतन निसर्गंध

केळूसकर गुरुजी सारखे आदर्श शिक्षक लाभले तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महामानव घडतात-चेतन निसर्गंध

शिक्षक चांगला असल्यास भावी पिढी घडू शकते- पो नि धनंजय ढोणे

परळी/ प्रतिनिधी

केळूसकर गुरुजी सारखे आदर्श शिक्षक लाभले तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महामानव घडतात, असे प्रतिपादन फुले -आंबेडकरी अभ्यासक चेतन निसर्गंध यांनी केले. ते स्टुडन्ट फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले – आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने आयोजित दादा केळूसकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रबोधनपर चर्चासत्राचे चे उद्घाटक म्हणून परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, परळी औ. विद्युत केंद्रचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, ए.तू.कराड, रानबा गायकवाड, नवनाथ दाणे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा प्रविण फुटके उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दादा केळूसकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले की, शिक्षक चांगला असल्यास भावी पिढी घडू शकते, आजच्या शिक्षकांनी आदर्श पिढी घडवावी असे विचार व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना चेतन निसर्गंध म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व खाजगी आयुष्यात केळूसकर गुरुजी यांनी शेवट पर्यंत साथ दिली. केळूसकर गुरुजी यांनी गौतम बुद्ध, क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांचे चरित्र मराठीत पहिल्यांदाच लिहिले थाँम्स पेन यांच्या राईट आँफ मँन इंग्रजी पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाड महाराजांकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली. मात्र ते उपेक्षित राहिले. तर अध्यक्षीय समारोपात प्रा फुटके यांनी आजच्या शिक्षकांनी केळूसकर गुरुजींचा आदर्श घेवून विद्यार्थी घडवावेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले – शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी केले. कार्यक्रमात शरद राठोड, प्रविण जाधव, ए.तू कराड यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास पत्रकार श्रीराम लांडगे, परमेश्वर मुंडे, न प चे महदु मस्के, एसबीआयचे जयपाल कांबळे, महेश मुंडे, हरिभाऊ आगलावे,फुले – आंबेडकरी अभ्यास समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन आकाश देवरे यांनी मानले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या