22.2 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

*दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला*

परळी (प्रतिनिधी)

क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य आयोजित बीड जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत परळी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे मुले वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ने प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धा न्यू हायस्कूल महाविद्यालय थर्मल कॉलनी परळी वैजनाथ येथे संपन्न झाल्या.

. याबद्दल शाळेचे मार्गदर्शक माननीय श्री किरण गित्ते साहेब सचिव: त्रिपुरा सरकार ,विवेकानंद युथ सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते ,शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील सर यांनी सर्व विजयी मुलांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री.सुनील इंगळे साहेब यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब देशमुख ,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अजय सोळंके , शालेय समितीचे सदस्य विजय राजसाहेब देशमुख, सूर्यकांत देशमुख ,क्रीडा स्पर्धेचे तालुकासमन्वय संजय उर्फ पापा देशमुख ,क्रीडा शिक्षक विलास आरगडे सर, अजय जोशी , प्राचार्य के व्ही. मोरे सर, दिल्ली उपप्राचार्य प्रा सुनील लोमटे सर, दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची प्रशिक्षक कु.संघमित्रा हुमने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान मिळवले .

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या