25.4 C
New York
Thursday, April 24, 2025

Buy now

विधानपरिषद सदस्य आ.अमितभाऊ गोरखे धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ बुधवारी परळीत

विधानपरिषद सदस्य आ.अमितभाऊ गोरखे धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ बुधवारी परळीत*

*सायंकाळी 6 वाजता शहरातील मातंग समाज मेळाव्यात साधणार सुसंवाद*

परळी वैद्यनाथ (दि. 12) – नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे सच्चे वारसदार आमदार अमित भाऊ गोरखे हे बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीत येणार आहेत.

सायंकाळी सहा वाजता नंदागौळ रोड येथील बी के एस गार्डन येथे आयोजित मातंग समाज संवाद मेळाव्यातून ते मातंग समाजातील पदाधिकारी व नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. या मेळाव्यास मातंग समाजातील मान्यवर नेते, लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, महायुतीतील पदाधिकारी, तसेच मतदारसंघातील मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

आमदार अमित भाऊ गोरखे हे पुण्यातील एक नामांकित व उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असून त्यांच्या सभांना राज्यात प्रचंड मागणी असते. अमित भाऊ हे मंत्री धनंजय मुंडे व आमदार पंकजाताई मुंडे यांना आपली मोठे भावंडे मानून चालणारे नेते आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या प्रेमाखातर ते आवर्जून परळीला सुसंवाद साधण्यासाठी येत आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या