कडा (प्रतिनिधी ):- सोपान पगारे
आष्टी येथील श्री गणेश विद्यालय येथे तालुका विधी सेवा समिती व आष्टी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता कायदेवीषयक शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आष्टी येथील मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.जी.इनामदार तसेच दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. उतकर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आष्टी वकील संघांचे उपाध्यक्ष ऍड किशोर निकाळजे हे होते. या कार्यक्रमात ऍड जी.व्ही.निकाळजे, ऍड डी.सी.शेख, ऍड यु.आर.पोकळे, ऍड एस. आर. चव्हाण, ऍड एस. एम. गळगटे यांनी लहान मुलांचे हक्क, हुंडा बळी, जातीभेत, स्त्री भ्रूण हत्या आणि सामाजिक दृषकृत्य व पॉस्को कायदा या विषयावर अंत्यत चांगल्या पद्धतीने विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.जी.इनामदार यांनी सर्व समावेशक असे मार्गदर्शन केले.यावेळी ऍड आबासाहेब आजबे, ऍड बी.बी. गर्जे आष्टी वकील संघांचे सचिव वाय.टी. सय्यद तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेशसिंह देसूरकर व शाळेतील शिक्षकवृद्ध, विध्यार्थी व आष्टी न्यायालयाचे कर्मचारी ए.जे. जाधव, बी. एन. उगले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड बी.बी. गर्जे यांनी केले आभार प्रदर्शन आष्टी वकील संघांचे सचिव वाय. टी. सय्यद यांनी मानले, तसेच आभार प्रदर्शन श्री गणेश विद्यालय आष्टी यांचे वतीने श्री तावरे सरांनी मानले.