विद्यापीठ केंद्रीय युवक महोत्सवामध्ये कडा येथील गांधी महाविद्यालयाच्या बीसीए विद्यार्थ्यांचे प्रहसन सादरीकरण
कडा ( प्रतिनिधी)- सोपान पगारे डॉ .
- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथे 25 डिसेंबर पासून केंद्रीय युवक महोत्सव 2024 25 ला शोभायात्रेने सकाळी नऊ वाजता महोत्सवात सुरुवात झाली या महोत्सवात कडा येथील गांधी महाविद्यालयाच्या बीसीएच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे या विद्यार्थ्यांनी प्रहसन कला प्रकार सादर केला आहे या प्रहसनाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली या प्रसनात अथर्वजवणे कृष्णा दिगे प्रथमेश जवने संकेत वामन धनश्री गर्जे कांचन गाडे आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकात गाजलेल्या लाडकी बहिणी योजना ‘आणि ‘ एक हे तो सेफ है॔ याचा प्रभाव विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवातही दिसला विद्यापीठाच्या वतीने आयोजित चार दिवसीय केंद्रीय युवा महोत्सवास बुधवारपासून सुरुवात झाली सकाळी नऊ वाजता विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून शोभायात्रेला सुरुवात झाली याचे उद्घाटन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते झाले मराठवाड्यातील महाविद्यालयांनी विविध कला सादर करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले तसेच प्रबोधनही केले हा युवा महोत्सव 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत सुरू आहे