- राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ आष्टी तालुकाध्यक्ष पदी पत्रकार जवणे यांची निवड
कडा (प्रतिनिधी) सोपान पगारे
राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघाची महत्त्व पूर्ण बैठक पुणे येथे नुकतीच झाली. यावेळी राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली संघाने आष्टी तालुका – अध्यक्ष पदी अतुल नारायणराव जवणे यांची निवड करण्यात आली.
अतुल जवणे हे नेहमीच समाजासाठी सातत्याने आपल्या विधायक कार्यातुन सर्व समाज बांधवाना हक्क, न्याय व मदत याद्वारे जे काही समाज कार्य करत आहेत, त्याच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली यांनी अतुल जवणे यांची आष्टी तालुका अध्यक्ष पदी निवड केली. न धर्म की, न समाज की, हम बात करते है, सीर्फ मानव अधिकार की, हे ब्रीद वाक्य घेऊन् आलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली या नावाने हि संस्था १९४८ साली दिल्ली येथे स्थापन
झाली, व महाराष्ट्रात ती १९९३ साली आली, आसून या संस्थेचे अठरा देशात काम चालू आहे, हि संस्था अन्यायाविरूद्ध लढा देणारी, व अन्यायाला वाचा फोडणारी आहे. या निवडीबद्दल देराजजी राघव (राष्ट्रीय संयोजक / प्रभारी) पंकजसिंह राठोड (राष्ट्रीय अध्यक्ष, महासचिव) संदिपजी लोंढे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश) व सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. दिलेली जबाबदारी स्विकारुन समाजाच्या हितासाठी राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघाच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदिपजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे अतुल जवणे म्हणाले. या निवडीबद्दल अतुल जवणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.