तंत्रज्ञान आणि कौशल्याशिवाय तरणोपाय नाही : बाळासाहेब आंबेकर
प्रतिनिधी सोपाने पगारे
जग झपाट्याने बदलत असून काळानुसार मुद्रण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे नविन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात केल्याखेरीज मुद्रण व्यवसायात तरणोपाय नाही, असे मत महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र मुद्राण परिषद व दी अहमदनगर प्रेस अँण्ड अलाईड ओनर्स असोसिएशच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातील न्यू आर्ट्स कॉलेजच्या मॅट्रिक हॉलमध्ये हा कार्यक्रम सोमवारी ( दि. ६ जानेवारी ) पार पडला.
यावेळी न्यू आर्टस् अँड कॉमर्सचे प्राचार्य बी. बी. सागडे, प्रिंटिंग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, प्रा. डॉ. महेबूब सय्यद, प्रिंटिंग टेकनॉलॉजि विभागप्रमुख अरुण गांगर्डे सर, मामूपचे उपाध्यक्ष मनोज बनकर, संजय कुऱ्हे, विनय गुंदेचा, अशोक बोरुडे आदी सह मुद्रण व्यावसायिक बांधव आणि मुद्रण कलेचे अभ्यासक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आंबेकर म्हणाले की, ‘मुद्रण व्यवसाय हा माणसाच्या महत्वाच्या गरजांशी संबंधित आहे. तो कधीही न बंद पडणारा नाही मात्र त्याचे स्वरूप दिवसागणिक बदलत जाणार आहे. या क्षेत्रात काम करताना जास्तीत जास्त माहिती घेतली पाहिजे’. दिल्ली येथे १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या मुद्रण व्यवसायविषयक प्रदर्शनाची माहिती सुर्जीतसिंग नेगी यांनी दिली. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान!
आयोजित कार्यक्रमात पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकार सुधीर लंके, विठ्ठल लांडगे, अशोक निंबाळकर, डॉ. सूर्यकांत वरकड, सुदर्शन बोगा आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले तर आभार सचिव नंदेश शिंदे यांनी मानले.