तरुणांनो शिक्षणाबरोबरच मैदानी खेळालाही महत्त्व द्या – पत्रकार अविनाश कदम
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आष्टी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ
कडा । ( प्रतिनिधी ) सोपान पगारे
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला महत्त्व दिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल तर क्रीडा स्पर्धेतुन देखील विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडवण्याची संधी आहे.विद्यार्थी व तरुण बांधवांनो आयुष्यात सूटबूट कधीही मिळतील, पण निरोगी शरीर मिळत नाही. याची जाणीव नव्या पिढीने ठेवावी.मोबाईलचा अतिरेक टाळावा आणि कोणत्याही खेळात सहभाग घ्यावा असा आशावाद व्यक्त करुन मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै. लोकमत, मराठवाडा साथीचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांनी दिला ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आष्टी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य गणेश हडतगुणे यांनी केले.
पुढे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकार अविनाश कदम म्हणाले की मुलांना ज्या क्रीडाप्रकारात रस आहे त्या क्रीडाप्रकाराकरिता पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर निश्चितच यश मिळते. आयुष्यात सूटबूट कधीही मिळतील, पण निरोगी शरीर मिळत नाही. याची जाणीव नव्या पिढीने ठेवावी मोबाईलचा अतिरेक टाळावा.’’ शिक्षण घेत असताना मैदानी खेळ देखील खेळले पाहिजे आपल्या ग्रामीण भागातील मांडवा येथील विट्ट भट्टी कामगाराचा मुलगा अविनाश साबळे देशात आपल्या गावाची तालुक्याची,आई वडीलांची मान उंचावली आहे.आजच्या काळामध्ये मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या स्पर्धेमधून अनेक प्रकारचे जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतात विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन जिल्हास्तरावर प्रवेश मिळवावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी खो-खो, हॉलीबॉल क्रिकेट, बुद्धिबळ १०० /२०० मीटर धावणे, कॅरम इत्यादी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी सौ. नागरगोजे एस के, दहिफळे डी.व्ही,आरोळे, ए.आर,सानप आर. एस, घुले एम. ई,एम जी पवार,अर्षद शेख, साईनाथ देवकर, रमेश डिडूळ, नेताजी साळवे,झाडे सुभाष आदींनी परिश्रम घेतले.