-0.2 C
New York
Monday, February 10, 2025

Buy now

अंबाजोगाई येथील गोळीबाराची ती घटना प्रेम संबंधांतून….

.

 

अवघ्या काही तासात पोलिसांनी घेतले त्या युवकाला पिस्टलसह ताब्यात …त्या तरुणांकड पिस्टल आला कुठून?

अंबाजोगाई –

बीड जिल्ह्यात अगोदरच दहशतीचे वातावरण वातावरण असताना पुन्हा एकदा खळबळ जनक घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरात सकाळी घडली. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील गणेश चव्हाण या युवका सोबत फिर्यादी मुलीचे मागील तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र आरोपी हा माझ्याशी नेहमी बोल म्हणून मुलीला धमकी द्यायचा तसेच घरच्यांना जीवे मारून टाकेन असं म्हणत असल्याने मुलीने आरोपी युवकाला नकार दिला. त्यामुळे युवकाने आज सकाळी अंबाजोगाई शहरातील घरी येऊन गोळीबार केला. अवघ्या काही तासात पोलिसांनी सादरील युवकाच्या रेणापूर येथून पिस्टलसह मुसक्या आवळल्या असून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या