14.7 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर

जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर

शासनाने केली 485 कोटींची तरतूद
आ. राजेंद्र पाटणी यांचे प्रयत्नाला यश
भाजपा महामंत्री नागेश घोपे यांची माहिती

वाशिम दि.१७: (अजय ढवळे )
आरोग्य सुविधांचे ‘अपग्रेडेशन’ व वैद्यकीय शिक्षणाची सोय असा दुहेरी हेतू साध्य करण्यासाठी झपाटलेल्या आ.राजेंद्र पाटणी यांचे प्रयत्न फळास आले आहेत. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता प्रशस्त झाला असुन इमारतीसाठी चिवऱ्यातील जागा निश्चित झाली आहे. तर इमारत उभी होईस्तोवर 7 वर्षासाठी जिल्हा रूग्णालयाची ईमारत व साधन सामुग्री वैद्यकीय शिक्षण विभागाला वापरण्यासाठी देण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. शिवाय इमारत बांधकाम, रूग्णालयांची डागडुजी,साहित्य खरेदी व पदभरतीसाठी तब्बल 485 कोटी रूपयांची तरतुद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी दिली आहे.

सन 1998 ला जन्माला आलेल्या वाशिम जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा आवश्यक त्या प्रमाणात सुधारलेला नाही. शिवाय येथे वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधाही तोकड्याच आहेत. परिणामी येथील रूग्णांना उपचारांसाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागते. नेमकी हिच बाब हेरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांनां अपग्रेड करून येथे वैद्यकीय शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी रेटा लावणे सुरू केलेले आहे. गत पंचवार्षिकमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जिल्ह्यात दंत महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालय असेल तेथेच दंत महाविद्यालय सुरू करता येईल असे धोरण मेडिकल कौंसिलने बनविल्यामुळे सदर दंत महाविद्यालय सुरू होवू शकले नाही. त्या बाबीचे शल्य आ.पाटणी यांना सारखे बोचत होते. त्यानंतर त्यांनी वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला होता.
परंतु 2019 मध्ये राज्यात सत्तापालट झाल्याने त्यांची ही मागणी रखडली होती. गत वर्षभरापूर्वी राज्यात सत्ताबदल होताच त्यांनी पुन्हा वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी रेटणे सुरू केले. अखेर मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व तत्कालिन वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. गिरिश महाजन यांनी आ. पाटणी यांच्या मागणीची दखल घेत वाशिमला वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्याची घोषणा केली होती. आता 14 जुलैला एक शासन निर्णय निर्गमित करून जागा निश्चितीसह पद निर्मितीचा प्रश्न शासनाने मार्गी लावला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी दिली.

चिवरा येथे साकारणार महाविद्यालयाची वास्तू
वाशिमच्या प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी चिवरा शिवारातील जागा निश्चित करण्यात आली असुन ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निशुल्क वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शासनाने जारी केल्याची माहिती भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी दिली आहे.

जिल्हा रूग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात
चिवरा येथील जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभी होण्यासाठी काही वर्षाचा कालावधी कागणार आहे. स्तोवर महाविद्याल सुरू करण्यासाठी जिल्हा सामाण्य व जिल्हा स्त्री रूग्णालयाची इमारत व साधन सामुग्री विनाशुल्क वैद्यकिय शिक्षण विभागाला वापरण्यासाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी दिली आहे.

इमारत,पदभरती, डागडुजीला 485 कोटींचा ‘अर्थ’
प्रस्तावित वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयात आवश्यक पदनिर्मिती, पदभरती, दैनदिन खर्च व बाह्यस्त्रोतांवरील खर्चासाठी 123.33 कोटी, जिल्हा रूग्णालयाच्या डागडुजीसाठी 25 कोटी, यंत्र सामुग्री खरेदीसाठी 120 कोटी तर नविन इमारत बांधकामासाठी 216 कोटी 75 लक्ष रूपयांची शासनाने आर्थिक तरतूद केली असल्याची माहितीही नागेश घोपे यांनी दिली आहे

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या