बरकत नगर भागातील रोड तात्काळ तयार करण्यात यावेत अन्यथा 27 जुलै रोजी पासून आमरण उपोषण करण्यात येईल एमआयएमची निवेदनाद्वारे न. प. कडे मागणी
युवा नेते मोहसिन भाई
परळी : अमोल सुर्यवंशी
बरकत नगर कच्ची बेकरी ते किराणा दुकाना पर्यंतचा रोड तात्काळ करण्यात यावा अशी मागणी एमआयएमच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती एमआयएमचे युवा नेते मोहसीन भाई यांनी दिली आहे. परळी शहरातील बरकत नगर भागातील रोडचे काम झाले नसल्यामुळे या भागातील रहिवासी यांना मोठ्या गैरसोय होत असून १) बरकत नगर कच्ची बेकरी ते नशीब किराणा दुकान पर्यंत २) दस्तगीर भाई यांच्या घरापासून ते अंबिका किराणा दुकान दुकानापर्यंत ३) रजा किराणा दुकानापासून मोबीन किराणापर्यंत ४) जावेद भाई चप्पल वाले यांच्या घरापासून ते उस्मानिया मज्जिदच्या पाठीमागील बाजूचा रोड ५) अंबिका किराणा दुकानापासून ते खुदुज भाई यांच्या घरापर्यंत रोड चे काम तात्काळ करून नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ थांबवावी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या भागात पाणी चिखल साचल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तरी याची तात्काळ दखल घेऊन या रस्त्यांची कामे नगर परिषदेने तात्काळ करावीत व नागरिकांची होत असलेली गैरसोय तात्काळ थांबवावी अन्यथा नगरपरिषदेसमोर गुरुवार 27 जुलै रोजी पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे एमआयएमचे युवा नेते मोहसीन भाई शेख यांनी दिला असून या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर कोणाच्या जीवितस हानी पोहोचली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपरिषदेच्या प्रशासनाशी असेल याची नोंद घ्यावी असा इशारा सुध्दा निवेदनाद्वारे एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई शहराध्यक्ष कादरभाई कुरेशी युवा नेते मोहसीन भाई शेख तसेच एमआयएमचे तालुका व शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी यांनी दिला आहे