————–
वर्तमानपत्रांना जीएसटीच्या जाचक अटीतून मुक्त करा-चंदुलाल बियाणी
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या चर्चासत्राला मोठा प्रतिसाद
————–
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-
लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून ओळख असलेल्या वर्तमानपत्रांना जीएसटीच्या जाचक अटीतून मुक्त करा असे आवाहन येेथील दै.मराठवाडा साथीचे संपादक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदुलाल बियाणी यांनी येथे केले.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया महाराष्ट्र, शाखा बीडच्या वतीने परळी वैजनाथ येथे रविवारी (दि.23) आयोजित करण्यात आलेल्या ‘लघू व मध्यम वृत्तपत्रापुढील आव्हाने व समस्या’ या विषयावर चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री बियाणी बोलत होते.
परळी शहरातील नाथ रोड मार्गावरील वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात रविवारी (दि.23) दुपारी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीण पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, भाजपचे जेष्ठ नेते श्रीराम मुंडे यांच्यासह संघटनेचे गोरख तावरे, भिका चौधरी, ओमप्रकाश शिंदे, विलास कटयारे, बीड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाकडे, परळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे आदी मान्यवरांसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रादरम्यान जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी भेट दिली व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
श्री बियाणे म्हणाले, वर्तमानपत्राला लागणार्या कागदावर जीएसटी आकरली जाते. यामुळे उत्पादन खर्च वाढतो, त्यामुळे वर्तमानपत्र वाचकांना देण्यात माफक दरात संपादकांना अडचणी येतात. जाहिरातीवर जी.एस.टी.आरकारली जात आहेत. जी.एस.टी.च्या जाचक अटीतून वर्तमानपत्रातून सुट द्यावी अशी असे आवाहन श्री बियाणी यांनी केले. वर्तमानपत्रापुढे असलेल्या विविध समस्यांमुळे आज वर्तमानपत्र काढणे अवघड झाले आहे. असे सांगून त्यांनी सोशल मिडियाचा प्रभाव वाढला तरी वर्तमानपत्राची विश्वासार्हता कायम असल्याचे सांगितले.
श्रीराम मुंडे यांनी यावेळी बोलतांना समाजाला नवी दिशा देण्याचे काम वर्तमानपत्र करतात. लोकांचा वर्तमानपत्रावरील विश्वास कायम आहे, वर्तमानपत्रांनी आपली विश्वार्हता जपावी असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी लघू व मध्यम वर्तमानपत्रापुढील अडचणी व समस्या सोडविण्यासाठी संपादकांनी संघटित होवून लढा देणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी नेताजी मेश्राम, श्री पितळे, प्रभाकर शिरुरे, आत्मलिंग शेटे, विलास कट्यारे आदींनी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्रदीप कुलकर्णी यांनी संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून वर्तमानपत्रांच्या सोडविलेल्या प्रश्नाबाबत माहिती देवून संघटनेच्या कार्याचा आढावा मांडला. प्रास्ताविक बीड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाकडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृतीवर निवड झाल्याबद्दल श्री गोरख तावरे यांचा तसेच जिल्हा माहिती अधिकारी श्री दैठणकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांनी तर आभार प्रदर्शन परळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष जगदीश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमानंतर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक येथे झाली.
वर्तमानपत्रांना जीएसटीच्या जाचक अटीतून मुक्त करा-चंदुलाल बियाणी
https://atulyamaharashtra.com/