◼️सीमा सिम कार्ड आणि भारतीय कनेक्शन: स्पेशल वृत्तांकन
सीमा हैदर भारतात आली कशी? नेपाळमधून एन्ट्रीचे पुरावेच नाहीत, तपासात आले समोरपाकिस्तानी नागरिक असलेल्या सीमा हैदरच्या चौकशीमध्ये यूपी एटीएसला रोज धक्कादायक माहिती मिळत आहे.नेपाळमार्गे भारतात अवैधरित्या आलेल्या पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची यूपी एटीएस चौकशी करत आहे. सीमा ग्रेटर नोएडामध्ये तिचा प्रियकर सचिन मिणासोबत राहत होती. एटीएसच्या तपासादरम्यान सीमा आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय आणखी बळावला आहे. सीमाला फक्त इंग्रजी वाचताच येत नाही, तर ती ज्या पद्धतीने इंग्रजी वाचत होती ते पाहून तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. इंग्रजी वाचत असताना सीमाने एकही चूक केली नाही. सीमा स्वत:ला निरक्षर असल्याचं सांगत आहे, पण तरीही तिने चांगल्या पद्धतीने इंग्रजी कसं वाचलं? यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे.
सीमा हैदर निरक्षर आहे मग तिने स्वत: पाकिस्तानमध्ये स्वत:ची संपत्ती कशी विकली आणि ती नेपाळमार्गे भारतात कशी आली? असे प्रश्नही एटीएसने विचारले. *सीमा हैदर पबजी खेळताना* ज्या लोकांच्या संपर्कात आली त्यातले बहुतेक जण दिल्ली एनसीआर भागातले आहेत, असंही तपासात समोर आलं आहे.
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरची अवैधरित्या घुसखोरी प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेकडून चौकशी सुरू आहे. जुलै : पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरची अवैधरित्या घुसखोरी प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत तरी काही ठोस असं समोर आलेलं नाही. सीमा हैदरची चौकशी करत असलेल्या केंद्रीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी भारत-नेपाळ सीमेवर सुनौली सेक्टर आणि सीतामढी सेक्टरमध्ये अद्याप तरी थर्ड नेशन सिटिजन आढळल्याचे समोर आलेलं नाही.
भारत नेपाळ सीमेवर दोन्ही ठिकाणाहून सीमा हैदर आणि सचिन यांनी भारतात प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. यानतंर उपलब्ध रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फूटेजची चौकशी केली गेली आहे. सध्या या माहितीची पडताळणी होऊ शकलेली नाही. चौकशीत सचिन आणि सीमा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणेनं 1850 किमी लांब भारत नेपाळ सीमेवरील सर्व बस मार्गावरून 13 मे रोजी जाणाऱ्या बसचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले.
सीमा हैदर आणि नोएडा येथील सचिन मीणा हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दोघेही सात दिवस हॉटेलमध्ये राहिले, त्यानंतर ते टॅक्सीने निघाले. सीमा आणि सचिन ज्या हॉटेलमध्ये राहिले त्या हॉटेलच्या रजिस्टरमध्ये या दोघांची कोणतीही नोंद नाही. दोघांनी नावं बदलली असावीत, असे हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
सीमा हैदरचे प्रकरण चर्चेत आले तेव्हा सीमा आणि सचिन यांनी पोलिसांना कळवलं होतं की ते दोघे काठमांडू, नेपाळमधील हॉटेल न्यू विनायक येथे 7 दिवस थांबले होते. काठमांडूच्या या भागात अनेक हॉटेल्स आहेत, जी येथे राहणाऱ्या लोकांकडून ओळखपत्र घेत नाहीत, फक्त नाव आणि तपशील नोंदवतात. यानंतर त्यांना हॉटेलमध्ये रुम दिली जाते.रिसेप्शनिस्ट गणेशचे म्हणणे ऐकून त्यांनी हॉटेल न्यू विनायकचे रजिस्टर तपासले असता त्यात सीमा आणि सचिनची नावं आढळून आली नाहीत, तर गणेशने स्वत: सीमा आणि सचिनची रूम बुक केल्याचं सांगितलं. हॉटेलमध्ये प्रवेश करताना सचिनने रजिस्टरमध्ये नाव बदलले असावे, असे गणेशने सांगितलं. सचिन अगोदर आला असल्याचे गणेशने सांगितले. माझी पत्नीही येणार असल्याचे सांगून रूम बुक केली.सचिन आणि सीमाने एकत्र राहून अनेक रील केले. हॉटेलचा रिसेप्शनिस्ट गणेश म्हणाला की त्याला वाटते की, या जोडप्याने खोलीत लग्न केलं होतं. रीलमध्ये पण तेच पाहायला मिळत आहे. दोघेही पशुपतीनाथ मंदिरात जात असत. एकदा, सीमाने क्लब आणि पबमध्ये जाण्याची इच्छा देखील दर्शविली होती, परंतु हॉटेलवाल्यांनी भारतीयांची फसवणूक केली जाते सांगितल्यानंतर ती गेली नाही.
सीमा हैदर आणि सचिन मीणा हे न्यू विनायक हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट गणेशच्या कुटुंबात मिसळले. ती पाकिस्तानी असल्याचा कोणालाही संशय आला नाही. सात दिवस हॉटेलमध्ये असताना सीमाने आपण पाकिस्तानातून आल्याचे कोणालाही सांगितले नाही. हॉटेलची रुम क्रमांक 204 खूपच लहान असून ते तिथे राहायचे. सीमा आणि सचिन बहुतेक वेळ हॉटेलच्या खोलीत घालवायचे. एके दिवशी दोघेही घाईघाईने टॅक्सीने निघाले.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरकडे पाच पाकिस्तानी अधिकृत पासपोर्ट पोलिसांना मिळाले आहेत. यासोबतच 4 मोबाईलही सापडले आहेत
सीमा हैदरकडे यूपी पोलिसांना पाकिस्तानी पासपोर्ट आणि अनेक मोबाईल फोन मिळाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पेशल डीजी प्रशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरकडे पाच पाकिस्तानी अधिकृत पासपोर्ट पोलिसांना मिळाले आहेत. ◼️यासोबतच 4 मोबाईलही सापडले आहेत. याशिवाय 1 असा पासपोर्ट सापडला आहे ज्यावर नाव किंवा आधार नंबर नाही. सीमाजवळ सापडलेले मोबाईल आणि पासपोर्ट तपासण्याचं काम सुरू असल्याचं यूपी पोलिसांचं म्हणणं आहे.यूपी एटीएसने सचिनचे वडील, सचिन आणि सीमा हैदर यांची चौकशी केली होती. यावेळी सीमाचा मोबाईलही तपासण्यात आला. ज्यामध्ये तिचा ◼️सर्व डेटा डिलीट झाल्याचे आढळून आले. सीमाच्या मोबाईलचा डेटा जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सीमाने तिचा लॅपटॉप पाकिस्तानात ठेवला आहे. एवढेच नाही तर तिने पाकिस्तानात वापरलेला फोन भारतात आणलेला नाही. ◼️नेपाळमधूनही सीमाने इतर लोकांच्या हॉटस्पॉटवरून Whatsapp कॉल केले. सीमाने तिचा लॅपटॉप पाकिस्तानात का ठेवला, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
सीमा हैदरच्या पाकिस्तानी कागदपत्रावरून निर्माण झालेला सर्वात मोठा प्रश्न तिच्या वयाचा आहे. त्याबाबत सीमा हैदर सातत्याने वेगवेगळी विधाने आणि दावे करताना दिसत आहेत. ◼️सीमा हैदर स्वत:ला पाचवीपर्यंत शिकलेली असल्याचे सांगते. सीमाकडे सप्टेंबर 2022 मध्ये बनवलेले ओळखपत्र मिळाले आहे, म्हणजे 2 वर्षांच्या मैत्रीनंतर सचिन मीणा सीमा हैदरच्या प्रेमात पडला होता. मग सीमाने हे कागदपत्र बनवले आणि त्यात तिची जन्मतारीख 1 जानेवारी 2002 लिहिली. त्यानुसार सीमा आता 21 वर्षांची आहे. दोन्ही कागदपत्रांमध्ये सीमाच्या वयात 6-7 वर्षांचा फरक आहे. हे असं का या प्रश्नांची उत्तरं सीमा देऊ शकत नाहीत. सीमाला पाकिस्तानात बनावट कागदपत्रं मिळाली का? एवढेच नाही तर सीमा हैदरजवळ भारतातही अनेक बनावट कागदपत्रे सापडली आहेत. आता ही कागदपत्रे बनवण्यात तिला कोणी मदत केली याचा शोध तपास यंत्रणांना घ्यायचा आहे. सीमा सातत्याने वेगवेगळे दावे करत आहे.