- Devendra Fadnavis : ऑनलाइन गेमिंगला परवानगी मात्र…; फडणवीस म्हणाले
ऑलाइन गेमिंग मुद्दा आज विधानपरिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. आमदार अभिजीत वंजारी यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी येणार आहे की नाही? तसेच या ऑनलाइन गेमिंगच्या जाहीराती करणारे कलाकार यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला. अनेक कलाकारसुद्धा गेमिंगच्या जाहीराती करतात. यावर सरकारची काय भूमिका आहे. असा प्रश्न त्यांनी विचारला.
यावर उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑनलाइन गेमिंगला परवानगी आहे. त्यांच्यावर सर्वानुमते 27,28 टक्के टॅक्स लावलेला आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी अशाप्रकारची कधीच कोणती जाहीरात केली नाही. म्हणूनच त्यांचे उदाहरण जर इतरांनी केलं. आणि ज्या गोष्टींमुळे आपली पिढी बरबाद होते. अशा गोष्टींची जाहीरात आम्ही करणार नाही. अशाप्रकारचा विचार त्यांनी केला. तर त्यांच्या हातून समाजकार्य होईल. मात्र कलाकरांनी निर्णय घ्या जाहीराती करायच्या की नाही. असे फडणवीस म्हणाले.