14.5 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

माझं सरकार खेकड्यांनी फोडलं म्हणत ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

माझं सरकार खेकड्यांनी फोडलं म्हणत ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून “आवाज कुणाचा” पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे.Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून “आवाज कुणाचा” पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात आले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे. आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की,खेकड्यांची एक मानसिकता असते. ज्या टोपलीत खेडके असतात त्या टोपलीवर झाकण ठेवण्याची गरज नसते. एखादा खेकडा वर जायला गेला की बाकीचे त्याला खाली खेचतात. तसेच हेही खेकडेच आहेत.शेवटी खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तोतिरकाच चालतो. गेल्यावर्षी मुसळधार पावसात माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं. ते धरणातच बसले होते. मातीमध्ये. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या