“पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्याल, आष्टी व जनता कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप व विध्यार्थाना मार्गदर्शन करून अर्ज स्वीकृती कार्यक्रम संपन्न.” .
बीड जिल्हा जात पडताळणी समिती विभागातील अधिकारी रवींद्र जी साहेब यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड प्रतिनिधी ..
सामाजिक न्याय व विशेष साहय विभाग मार्फत जात पडताळणी समिती, बीड अंतर्गत 26 जून ते 26 जुलै या कालावधीत मंडनगड पँटर्न अंतर्गत “राजश्री शाहू महाराज जयंती पर्व निमित्त” बीड जिल्यात जात वैधता प्रमाणपत्र वाटप व प्रस्ताव स्वीकृतीची विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमे अंतर्गत आज दिनांक १८/०७/२०२३ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्याल, आष्टी व जनता कनिष्ट महाविद्यालय,आष्टी येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप व विद्यार्थ्यांना मार्गदशन करून अर्ज स्वीकृती, या समितीचे अध्यक्ष मा.महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, श्रीमती. संगीता मकरंद (मँडम) उपयुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड तसेच जात पडताळणी समिती विभागातील कृष्ण कार्यक्रम असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी मा. आर. एम. शिंदे, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांच्या उत्कृष्ट अभ्यासपूर्व मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदशन करण्यात आले. तसेच या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जात वैधता पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालचे उप प्राचार्य प्रा.भवर सुनील सर तर जात पडताळणी समिती, बीड या कार्यालयाचे विधी अधिकारी अँड. श्रीकांत साबळे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदशन केले. या वेळी समानसंधी केंद्राचे समन्वयक प्रा. शिवाजी जमदाडे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश फुले यांनी केले, या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीतच या उत्कृष्ट उपक्रमाचे सर्व बीड जिल्हा जात पडताळणी समिती येथील अधिकारी यांच्या उत्कृष्ट कार्याचे सर्वत्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच त्यांचे पालक गुरुजन यांच्याकडून कौतुक होत आहे .