भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा
महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी
भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. यात जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात दोन माजी मुख्यमंत्र्यांचा तर राज्यातील तीन नेत्यांचा समावेश आहे.
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर या तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी कायम आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आलं आहे. विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत या तीनही नेत्यांचं अभिनंदन केलं आहे.
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी
https://atulyamaharashtra.com/