नेकनूर येथील हॉटेल वर IPS पंकज कुमावतांची धाड, 3 तरुणींची सुटका…
केज :
IPS पंकज कुमावत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जाणकी हॉटेल, चौसाळा ता. जि. बीड येथे बियरबार व लॉजींग मध्ये धाड टाकून 3 महिलांची सुटका केली. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स.पो,नि विलास हजारे हे करत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळालेल्या माहितीवरून जाणकी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर इसम नामे गणेश मच्छीद्र लहाणे (रा. महाकाळ ता. अंबड जि.जालना), दिनेश प्रल्हाद सोनवने (रा. चौसाळा ता. जि. बीड), दशरत तानाजी थोरात (रा. चौसाळा ता.जि. बीड) हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी काही महीलांना पैशाचे अमिष दाखवुन पर पुरुष ग्राहकां सोबत शारीरीक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत आहेत,आलेल्या पैशांची वाटणी करुन घेवुन महीलांकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत आहे. अशी माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन डमी ग्राहक पाठवुन पडताळणी केली. त्यानंतर स्वतः पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह जाणकी हॉटेल, बियरबार व लॉजींग मधील दुसऱ्या मजल्यावर 19.30 वा. सुमारास छापा मारला. यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली हॉटेल मालकावर नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अंबाजोगाई, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार (केज),व पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.