19 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

बीड बसस्थानकात १ लाख रुपये चोरीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

बीड | प्रतिनिधी
दिनांक 27/07/2023 रोजी दुपारी 15.30 वा. चे सुमारास फिर्यादी भास्कर नेमिनाथ आव्हाणे वय
45 वर्षे व्यवसाय शेती रा. पाणेगाव ता. अंबड जि.जालना हे बीड बसस्थानक येथुन अंबडकडे जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्टचे खिश्यात ठेवलेले एक लाख रुपये कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी केले आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादवरून पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं 399/2023 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरची बाब गंभीरतेने घेवून मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपींना
तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. अपर पोलीस अधीक्षक, बीड व पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा पथकाने घटनास्थळी भेट देवून आरोपी व चोरी गेलेल्या मालाचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा 1) सुभाष अर्जुन गायकवाड रा. शिरापुर (धुमाळ) ता. जि. बीड यांनी केला आहे. अशी
खात्रीशीर माहिती मिळाल्या वरुन दिनांक 29/07/2023 रोजी सदर आरोपी हा अंबिका चौक बीड येथे उभा असल्याची माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्याचे अंगझडती मध्ये गुन्हयातील 1,00,000/- रु. पंचासमक्ष जप्त केले आहेत. सदर आरोपी नामे 1) सुभाष अर्जुन गायकवाड वय – 34 वर्ष रा. शिरापुर ( धुमाळ ) ता. जि. बीड यास पो.स्टे. शिवाजीनगर गु.र.नं. 399 / 2023 कलम 379 भादंवि चे तपासकामी पो.स्टे. शिवाजीनगर यांचे ताब्यात देऊन पुढील तपास पो.स्टे. शिवाजीनगर करीत आहे. आरोपीतांकडुन अशा प्रकारचे आणखीन
गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी ही मा. श्री नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्री सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड, मा. श्री. संतोष साबळे पोलीस निरिक्षक स्थागुशा, बीड, पो.उप.नि. श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना – सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, पो.शि सचिन
आंधळे, विकी सुरवसे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या