धन्यवाद! ना.धनंजय मुंडे साहेब!!
सबंध श्रमिकांचे,कष्टकऱ्यांचे कैवारी,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी सेनानी,थोर समाजसुधारक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परळीमध्ये स्थापन झाला!
लोकनायक अण्णाभाऊंचा पुतळा शक्ती,भक्ती,स्फूर्तीचे प्रतिक!!
धर ध्वजा कर ऐक्याची,
मनीषा जी महाराष्ट्राची!
पाऊले टाक हिमतीची,
कणखर जणू पोलादाची!!
घे आन स्वातंत्र्याची,
महाराष्ट्रास्तव लढण्याची!
उपकार फेडूनी जन्मभूमीची जाया,
महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया!!
– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अनेक वर्षांपासून परळी वैजनाथ शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा साठे चौकात बसवावा म्हणून नागरिकांची जिव्हाळ्याची मागणी होती.आज तो सोनियाचा दिनू उगवला…बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकात महाराष्ट्राच्या लाडक्या सुपुत्राचा,अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापित करण्यात आला!!