21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय सिरसाळा येथे पालक मेळावा संपन्न

न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय सिरसाळा येथे पालक मेळावा संपन्न

सिरसाळा | अतुल बडे :

येथील न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय सिरसाळा येथे भव्य पालक मेळावा संपन्न झाला आहे. ह्या पालक मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. विरेंद्र दादा सोळंके, मुख्याध्यापक घोळवे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शालेय समिती अध्यक्ष भागवत बप्पा देशमुख होते . दिनांक २२ वार शुक्रवार रोजी पालक मेळावा आयोजित केला होता .कार्यक्रम दरम्यान उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतांना प्राध्यापक शिंगणे म्हणाले कि,
पालकांनी मुलांच्या बाबतीत शिक्षका सोबत संवाद करावा, पालकांनी घरी अभ्यास करून घ्यावा , मुलांना पालकांनी वेळ द्यावा , मुलांची तुलना दुसयासोबत करु नका , मुलांकडून अवास्तव अपेक्षा करू नका , मुलांना योग्य ते संस्कार द्या, मुलांकडे मोबाईल देऊ नका असे मार्गदर्शन प्राध्यापक शिंगणे एस बी. यांनी केले . तसेच लक्ष्मण पौळ यांनी देखील मार्गदर्शन केले . कार्यक्रमास प्रभाकर पौळ,राजेभाऊ निर्मळ,संतोष पांडे,पत्रकार आशोक गलांडे,पत्रकार रमेश लहाने आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन गायकवाड सर तर आभार डोंगरे सरांनी केले . तसेच शालेय समितीचे सर्व सदस्य पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते .

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या