14.5 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

माजलगाव विधानसभे मधुन मा रमेशराव आडसकर यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का ?

माजलगाव विधानसभे मधुन मा रमेशराव आडसकर यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का ?

भोगलवाडी ( बाबुराव तिडके )

लोकसभा / विधानसभेचे निवडणुकीचे वारे जोरात वाहु लागले आहे राष्ट्रवादी मध्ये गट नाहीत पण भाजपा मध्ये तीन गट माजलगाव मतदार संघामध्ये आहेत आमदार किच्या मोहापाई योग्य वेळ येताच भाजपाचाच उमेदवार भाजपाचे लोक पराभुत करतात त्यामुळे पुढील तिकिट कोणालाही भेटो पण आडसकरांचे आमदाराकिचे स्वप्न या मतदार संघातुन पूर्ण होणार का हि चर्चा मात्र मतदार संघात जोरात चालु आहे .
माजलगाव मतदार संघ हा भाजपा करिता आमदार निवडुन आणन्याकरिता अनुकुल आहे परंतु या मतदार संघामध्ये भाजपा गटातटामध्ये विखुरला असल्याने याचा फायदा राष्ट्रवादीला होत आहे मा आ आर टी देशमुख पून्हा या मतदार संघातुन निवडणुक लढण्यासाठी ईच्छुक आहेत मा श्री मोहनदादा जगताप तर आमदारकीचे बाशिंग बांधुनच आहेत मा रमेश आडसकर यांची गाडी तर माजलगाव मतदार संघामध्ये सुसाट धावत आहे पण वरिष्ठ पातळीवर युती झाली तर हि जागा राष्ट्रवादीला जाऊन आमदार प्रकाशदादा सोळंके हेच उमेदवार राहातील कारण त्यांनी ना अजितदादा गटाकडे प्रवेश करताना अगोदर त्यांच्या कडुन माजलगाव मतदार संघातील उमेदवार पुढचा मीच असेल हा शब्द घेतलेला आहे आणी त्यांनी होकार देखिल दिलेला आहे पण भाजपा वाल्यांचे काय या तिघा भाजपांच्या नेत्या पैकी एकाला विधानपरिषदेवर घेतले जाऊ शकते आडसकर साहेब पाठीमागील वेळेस थोड्या मताने पराभुत झाले पण या वेळेस तरी त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का ?
असे झाले तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडूनही या तिघा पैकी एक जन हाताचा पंजा या चिन्हावर लढू शकतात तसी शक्यताही नाकारता येत नाहीए मा मोहन जगताप साखर सम्राट असल्यामुळे त्यांची राजकिय ताकत मतदार संघामध्ये मोठी आहे मा आर टी देशमुख यांनी जनसंपर्क वाढविलेला आहे मा रमेश आडसकर यांची तर हाक देताच गाडी वेगाने धावत आहे येणारा काळच ठरवेल् माजलगाव मतदार संघातुन आमदारकीचे कोणाचे स्वप्न होणार पूर्ण .

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या