परळीत शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना जोडे मारो आंदोलन
परळीत शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना जोडे मारो आंदोलन ;
नार्वेकरांनी खऱ्या शिवसेनेच्या विरोधात निकाल देऊन लोकशाही पायदळी तुडवली – सातपुते, पालीवाल, विभूते
परळी वैजनाथ दि २१ (प्रतिनिधी) :- गेली साठ वर्षांपासून ८० टक्के समाकारण आणि २० टक्के समाजकारण ते ब्रीदवाक्य सांभाळत गोरगरीब व सर्व सामान्य जनतेस न्याय देणाऱ्या हिंदुर्हदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेसाहे यांची शिवसेना अधिकाराचा गैरवापर करून शिवसेनेच्या जीवावर मोठी पदे उपभोगीत गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदेच्या गळ्यात घालणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात परळीत शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला.
काही महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्याशी गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदे सह ४० आमदारांवर ताशेरे ओढत त्यांना अपात्र करण्याचा निर्णयाचा अधिकार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल नार्वेकर यांनी जवळपास नऊ ते दहा महिने टोलवाटोलवी करीत काल त्यांनी आपला निर्णय घोषित करीत हिंदू र्हदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना असलेली बंडखोर गद्दार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात घातली या निर्णयाने महाराष्ट्रभर तीव्र प्रसाद उमटत परळीतही शिवसेनेमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता परळीचे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, शहरप्रमुख राजेश विभुते तालुकाप्रमुख महेश उर्फ पप्पू केंद्रे, तालुका सचिव प्रकाश साळुंके, विधानसभा संघटक सतीश जगताप, उप शहरप्रमुख संघपाल होके यांच्या प्रमुख उपस्थितीत कायद्याशी व स्वतःच्या खुर्चीशी गद्दारी करीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अन्यायकारक निकाल दिला यामुळे नार्वेकरांना जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘शिवसेना आमची, नाही कुणाच्या बापाची’, ‘राहुल नार्वेकराच करायचे काय खाली मुंडक वरी पाय’, अशा गगनभेदी घोषणा देण्यात येऊन राहुल नरेकरांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे राहुल नार्वेकर यदा कदाचित परळीला आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासण्यात येईल असा गंभीर इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात येऊन नार्वेकरांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, व शहर प्रमुख राजेश विभुते यांनी आपला तीव्र संताप व्यक्त करीत सांगितले. त्यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.