भारतीय राज्यघटनेने ओबीसींना दिलेले अधिकार संपवण्याचा कट —प्रा.टी.पी.मुंडे
*13 जानेवारी रोजी बीड येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभेला ओबीसी बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे— विलास ताटे,सुरेश टाक,विनायक गडदे,गोपाळ तांदळे, सूर्यकांत मुंडे, राजकुमार डाके, श्रीकांत पाथरकर!*
परळी वैजनाथ प्रतिनिधी
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून कलम 340 अन्वये ओबीसींना आरक्षणाचा अधिकार बहाल केला तो आरक्षणाचा अधिकार संपवण्याचा कुटिल डाव सध्या सुरू असून याला हाणून पाडण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन ओबीसी नेते तथा ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.टी.पी. मुंडे (सर) यांनी केले.
शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुलन येथे दुपारी ३ वा. ओबीसीची आरक्षण बचाव महा एल्गार सभा संपन्न होणार आहे. ओबीसी परळी शहर बांधवांची बैठक औद्योगिक वसाहत येथे 9 जानेवारी रोजी संपन्न झाली. ओबीसीच्या एल्गार सभेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब, ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, ओबीसी जन मोर्चाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत बावकर साहेब, उपाध्यक्ष जे.डी. तांडेल साहेब, शब्बीर अन्सारी साहेब आदी मान्यवर ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे. तरी या भव्य होणाऱ्या ऐतिहासिक ओबीसी महाएल्गार सभेस लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव, ओबीसी संघटनांचे विविध पदाधिकारी, भटके व विमुक्त संघटनांचे पदाधिकारी, आलूतेदार बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी महिला युवक यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून ओबीसीची एकजूट दाखवण्यासाठी आणि आपले अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन विलास ताटे, सुरेश टाक, विनायक गडदे, गोपाळ तांदळे ,सूर्यकांत मुंडे, राजकुमार डाके, श्रीकांत पाथरकर यांनी केले आहे.
यावेळी या बैठकीला वैजनाथ कळसकर, सोमनाथ आघाव, प्रभाकर हजारे, चेतन सौंदळे, षिवरत्न मुंडे, प्रा.विजय मुंडे, विनायकराव गडदे, कांता मुंडे, सुर्यकांत मुंडे, बबलु मुंडे, अयुब काकर,शंकरराव आडेपवार, महेष बागवाले, राजकुमार डाके, नरहरी लोखंडे, मनोज बुंदिले, सुदाम लोखंडे, बालासाहेब पोरे, प्रा.राम पेन्टेवार, शरद कावरे, संजय वानरे, आत्मलिगं षेटे, भालचंद्र तांदळे, प्रभाकर हजारे, रोहित कुुसुमकर, पद्माकर भंडारे, प्रा.फुटके सर, चंद्रकांत उदगीरकर, मुन्ना ताटे, सोमनाथ तम्मलवार, वैजनाथ कांबळे, सुरेन्द्र कावरे, षाम गडेकर, बंडू म्हाळंगी, षरीफ भाई,षकील कुरेषी, संजय फड, बंडू आघाव, राजेष साबणे, अनिल आ्यटेकर, अरूण चिखले, संजय देवकर, भिमराव सातपुते, वैजनाथ तेलंग, व्यिणु साखरे इत्यादींनी केले आहे.