वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्थता कायम आहे
माहूरगड विशेष बातमीपत्र :
माहूरगड येथील अधिवेशनात आणि पुरस्कार वितरण समारंभात राज्य भरातील पत्रकार बांधव सहभागी झाले होते, यावेळी आपल्या मनोगत पर भाषणात आपल्या सामजिक आणि आपल्या पत्रकारांबद्दलच्या भावना आणि सत्यता या बाबतीत आपले विचार विचारमंचावर मांडले,
राज्यभरातील पत्रकार येथे आल्याचा आनंद होत आहे. आज मंडपामध्ये बसण्यासाठी जागा नाही, एकही खुर्ची रिकामी नाही, हेच या कार्यक्रमाचे यश आहे. टेक्नॉलॉजी सुधारत असली तरी वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्थता कायम आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचे कौतुक करतो,’ असेही ते म्हणाले.