रोजगार सेवक संघटनेच्या मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पदी- भगवानराजे कदम यांची नियुक्ती
नाशिक | प्रतिनिधी
ता.परळी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ अंतर्गत भारतीय कामगार सेनेच्या नाशिक येथील पत्रकार परिषद आयोजित निर्णयात घेतल्या नंतर राज्यातील सर्व रोजगार हमीचे पायथा ते माथा शेतकऱ्यांना लाभ मिळून देणारे ग्राम पंचायत स्तरावर शासकीय दुवा समजणारे रोजगार सेवक हे नाशिक ते मुबंई लॉन्ग मार्च दिनांक 15 जानेवारी 2024 ला पायी दिंडी करत आहे. गेल्या 2005 ते 2024 या कालावधी त ही यांना टक्केवारी वर काम करावे लागते आहे जी रोजगार हमी 1972 मध्ये महाराष्ट्र राज्य येथे चालू होऊन ती देशातील इतर राज्यात विस्तार झाला तेथील रोजगार सेवक 15 ते 20 हजार रुपये महिन्याला मानधन घेत आहेत अश्या रोजगार सेवक यांनी लॉन्ग मार्च करण्याचे ठरवले आहेत ..या विषयावर पत्रकार परिषद झाली असता त्यानंतर कामगार सेनेचे प्रदेशाअध्यक्ष श्री.विनोद भाऊ चव्हाण व इतर पदाधिकारी यांचे समवेत बीड मधील परळी तालुक्यातील श्री भगवानराजे कदम यांना मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली आहे त्यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समिती सदस्य श्री.प्रवीण पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष कांतीलाल जाधव सोनीनाथ गवळी अशोक जाधव आदी ग्राम रोजगार सेवक हजर होते