भगवान प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आंतर शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार बक्षीस वितरण
परळी (प्रतिनिधी)
येथील भगवान प्राथमिक विद्यालयात 26 जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन तथा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अंतर शालेय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक दहिफळे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुरेशराव गीते, जगमित्र नागा विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एम. सातभाई सर, आयडीबीआय बँकेचे माजी व्यवस्थापक गोपाळराव तांदळे, दीनदयाळ बँकेचे वैजनाथराव गुट्टे, डावरे गुरुजी ,मानवतकर मॅडम, प्रभाळे मॅडम, कागणे ताई आणि जाधवर ताई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि आपल्या मनोगतामधून देशभक्तीचा जागर मांडला तर उपस्थित पाहुण्यांनीही राष्ट्र आणि मानवतावाद या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच शिक्षणाबरोबरच खेळामधून कौशल्य दाखवून आपले नाव उज्वल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापकांच्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर अनंत मुंडे व गोविंद मुंडे यांनी केले तर आभार प्रगटन सचिन अंबाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडू आघाव,अशोक वेडे, सिंधू सोनवणे, संघमित्रा वाघमारे, अंजली कुलकर्णी ,महिंद्र वाघमारे ,सचिन गवळी, राजेश विभुते सुनील चव्हाण यांनी सर्वतोपरी सहकार्य केले या कार्यक्रमास गल्लीतील पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.