21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

रामायण महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ

रामायण महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ

स्व . श्यामरावजी देशमुख व्याख्यानमालेत श्री अभय भंडारी यांचे वक्तव्य .

परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)
रामायण, महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ असल्याचे प्रतिपादन अभय भंडारी यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजित श्यामराव देशमुख स्मृती समारोहात अभय भंडारी बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष संजय देशमुख तसेच सचिव रवींद्र देशमुख,कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी राम हा केवळ उपासनेचा विषय नसून तो एक विचार,आस्था आणि अस्मिता यांचा विषय असल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुलींच्या शिक्षणाचा वसा घेऊन श्यामराव देशमुख यांनी या संस्थेची उभारणी केली असे सांगून महाविद्यालयाच्या जडणघडणीचा मागोवा आपल्या वक्तव्यात घेतला. रामायण महाभारत आणि आजचे जीवन या विषयावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. माणसाला आपले चरित्र घडवायचे असेल तर त्याने रामायणातल्या व महाभारतातल्या विषयाचे चारित्र्य घडविणारे संस्कार अंगीकारले पाहिजेत. या दोन महान ग्रंथामधील विचार हे अनेक पिढ्यावर सुसंस्कार करत आले आहेत आणि पुढेही करतील. संपत्ती मनुष्यावर स्वार झाली तर ती मनुष्याचा नाश करू शकते म्हणून संपत्तीला मनुष्यावर स्वार होता कामा नये. यासाठी प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे केला पाहिजे. युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्या कथेच्या माध्यमाने शाब्दिक ज्ञान आणि त्याचे अनुष्ठान यामध्ये फारच मोठे अंतर असते हे त्यांनी दाखवून दिले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हनुमान आणि श्रीकृष्ण यांचा बेस्ट डिप्लोमॅट म्हणून केलेला उल्लेख त्यांनी आवर्जून उद्धृत केला.याशिवाय रामायण व महाभारतातील अनेक कथांच्या सहाय्याने भगवद्गीतेतील श्लोकांच्या आधारे व विविध ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे त्यांनी अन्नशुद्धी, विचारशुद्धी, विवेकप्राप्ती अशा अनेक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ लक्ष्मीनारायण लोहिया , संस्थेचे संचालक हेमंत कुलकर्णी, मीनल लोहिया व विद्या देशमुख ,स्नेहा देशमुख तसेच अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते .या व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर रांगोळी स्पर्धेतील पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा डॉ अरुण चव्हाण व प्रा डॉ कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या