21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

औष्णिक विज निर्मीती केंद्रातील चाणाक्ष व बनेल अधिकारी हे शाब्दीक खेळ खेळत आहेत: उपोषण कर्त्याची मागणी

औष्णिक विज निर्मीती केंद्रातील चाणाक्ष व बनेल अधिकारी हे शाब्दीक खेळ खेळत आहेत: उपोषण कर्त्याची मागणी

( मयत विकास मुंडे यांच्या विधवा पत्नीची पतीच्या जागी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी सेवेत सामावुन घेण्याच्या मागणी)

 

*काय मागणी केली आहे निवेदनाच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे*

विकास गोवर्धन मुंडे हे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन परळी औष्णिक विज निर्मीती सेवेत कार्यरत असताना त्यांचा दि. ०३/०८/२०१८ रोजी मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या पाश्चात कुटुंब उघडयावर पडलो आहोत. आमचा आर्थीक कणा गेल्यामुळे व ज्या जमीनीवर आमचा उदरनिर्वाह होता ती जमीन परळी औष्णिक विज निर्मिती केंद्राच्या प्रकल्पासाठी संपादीत केल्यामुळे आज रोजी आमच्याकडे कुठलेही जगण्याचे साधन नसल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पतीच्या मृत्यु नंतर रिक्त झालेल्या जागेवर व आमची शेत जमीन सर्वे नं./गट नं. ३०५/७ मधील सामाईक क्षेत्र ०२/०१ हे ३०/६० आर एवढी जमीन हि परळी औष्णीक विज निर्मीती केंद्राच्या विस्तारीकरणा साठी संपादीत करण्यात आली असल्यामुळे मला पतीच्या जागी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी सेवेत सामावुन घेण्याच्या न्याय मागणीसाठी मा. मुख्य अभियंता, औष्णिक विज निर्मीती केंद्र परळी वै. जि. बीड यांना दि. २०/०८/२०१८, २६/११/२०१८, २०/०७/२०२२ रोजी लेखी अर्ज व निवेदन देवून विनंती करण्यात आली आहे. परंतु परळी औष्णिक विज निर्मीती केंद्रातील चाणाक्ष व बनेल अधिकारी हे शाब्दीक खेळ खेळत असुन मी विधवा असलेल्या महीलेच्या दुःखावर एक प्रकारे मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे दिसुन येत आहे. कारण नाते संबध लावत असताना मुळ मालका बरोबर ‘पुतण्याची पत्नी’ असे नाते संबध लावुन एक प्रकारे दिशाभुल करीत आहेत. पुतण्याची पत्नी असे नाते संबध लावण्या ऐवजी प्रकल्पग्रस्त कर्मचारी मयत विकास मुंडे यांची विधवा पत्नी असे नाते लावुन माझ्या पतीच्या रिक्त झालेल्या जागी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणुनच मला शासन सेवेत सामावुन घेवुन न्याय देणे अपेक्षित आहे. व मी तशी दया याचना आपल्या सेवेत विनंती पूर्वक करीत आहे.

 

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या