20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जनसेवा शिबिराचे आयोजन

वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जनसेवा शिबिराचे आयोजन

सामाजिक न्याय विभागाचे परळी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

परळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते नगरपरिषद परळी वैजनाथ वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महिपाल दत्ताभाऊ सावंत यांच्या सृजनशील विचारातून बौद्ध विहार पंचशील नगर परळी वैजनाथ येथे दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जनसेवा शिबिराचे आयोजन केले आहे.

सामाजिक न्याय विभागाचे परळी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील जनसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड वाटप, नवीन राशन कार्ड वाटप, नवीन मतदार नाव नोंदणी, असे अनेक समाज उपयोगी कार्य या माध्यमातून संपन्न होत आहेत. महिपाल दत्ताभाऊ सावंत यांच्या सौजन्याने हे जनसेवा शिबीर आयोजित केले असून
महिपाल सावंत यांचे वडील दत्ताभाऊ सावंत हे राजकारणा सोबतच, सामजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात.
याच प्रेरणेनेने प्रेरित होऊन महिपाल दत्ताभाऊ सावंत यांनी आपल्या सामाजिक कार्यात आणखीन भर टाकत जनसेवा शिबिराचे भव्य असे आयोजन प्रभाग क्रमांक १० मध्ये केले आहे.

प्रभाग क्रमांक दहा मधील गरजू लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महिपाल दत्ताभाऊ सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिरासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे

आयुष्यमान भारत कार्ड साठी लागणारी कागदपत्रे :आधार कार्ड

नवीन राशन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे:
आधार कार्ड, लाईट बिल, बँक पासबुक, व पासपोर्टचा फोटो

नवीन मतदार नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड एक पासपोर्टचा फोटो,व कुटुंबातील व्यक्तीचे मतदान कार्ड

सदरील शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ठीक :सकाळी स१० ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक दहा मध्ये ठिकाण बौद्ध विहार पंचशील नगर परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या