महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या रिपब्लीकन सेनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अजय गोरे यांची कार्य व कर्तृत्वामुळे तिसऱ्यांदा युवक जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्रतील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक रिपब्लीकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, इंदू मिल चे प्रणेते, आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लीकन सेनेच्या मार्फत आवाज उठवला जातो. सर्व सामान्यांना न्यायमिळवून देण्यासाठी अग्रेसर असणारे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारे, युवक नेतृत्व अजय गोरे यांची सलग तिसऱ्यांदा रिपब्लीकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने , प्रदेशाध्यक्ष समाजभुषण काकासाहेब खांबाळकर, युवक प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे, प्रदेश संघटक भैय्यासाहेब भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष मुजीब पठाण, प्रदेश सचिव माधव दादा जमदाडे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे, चंद्रकांत रूपेकर, हेमंत पायाळ, मराठवाडा संघटक शेषेराव वीर, जिल्हाध्यक्ष पच्छिम सतिश पायाळ, जिल्हाध्यक्ष पूर्व बाबासाहेब अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गोरे यांचे कार्य पाहून सलग तिसऱ्यांदा त्यांची युवक जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड केली.