पुणे वाहतूक कोंडीत जगात सातव्या क्रमांकावर
पुणे : पुणे वाहतूक कोंडीत जगात सातव्या क्रमांकावर आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीने मुंबई, दिल्लीलाही मागे टाकले आहे. जगभरातील ३८७ शहरांतील वाहतूक कोंडीबाबतचा एम्स्टर्डमच्या टॉमटॉमने एक रिपोर्ट जारी केला. त्या रिपोर्ट्सनुसार, जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणा-या शहरात पुणे सातव्या क्रमांकावर आहे. तर भारतातील दुसरे शहर ठरले आहे.
पुण्याने मुंबई आणि दिल्ली या शहरांना मागे टाकले आहे. पुण्यात वाहतूक कोंडी वाढण्याची कारणे पुढीलप्रमाणे… सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव, रस्त्यांची कमी रुंदी, नियोजनचा अभाव, रोड आर्किटेक्चर पूर्णपणे अपयशी.
पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त
पुण्यात सध्या १० किलोमीटर प्रवास करण्यासाठी साधारण २८ मिनिटे लागतात. त्यामुळे पुणेकरांना वेळ वाया जातो. शिवाय या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त आहे.