2 C
New York
Saturday, January 18, 2025

Buy now

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जिथे जात पात गळून पडतात- डॉ.अनिल काठोये

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जिथे जात पात गळून पडतात- डॉ.अनिल काठोये

४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

परळी/ प्रतिनिधी

रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ असे एकमेव दान असून या दानात जात, पात, धर्म सर्व काही गळून पडतात आणि माणुसकीचे नाते सुदृढ होते असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले. ते दि १५ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शक्तीकुंज वसाहत, दवाखाना परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, वैद्यकीय अधीक्षक ज्योती रांदड,अधीक्षक अभियंता धनंजय कोकाटे ,अधीक्षक अभियंता राजीव रेड्डी,वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अरविंद येरणे, शिवजयंती अध्यक्ष बालाजी बोंडगे, भीमराव शिरसाट, मानव संसाधन विभागाचे एम एन जाधव,डॉ राजेश गट्टूवार, डॉ प्रितम कांबळे, सुनिल पवार,अंकुश जाधव ,संदीप काळे, अंबिका चौरे,सरवदे,चैतन्य जाधव, चेतन रणदिवे, संदीप पाटील, तुकाराम पाटील, सुनील ढोकळे, केशव जाधव, संदीप कुंदे,दिनेश शिंदे, गजानन मांडरे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १८ रोजी प्रश्नमंजुषा, रांगोळी, निबंध स्पर्धा व आनंद मेळावा आणि शाहीर बंडू भाऊ खराटे यांचा पोवाडाचा कार्यक्रम तसेच बाल शिवव्याख्याते आनंदी जाधव तर सोमवार दिनांक १९ रोजी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण तर सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती संभाजी नगरचे प्रा प्रदीप सोळंके यांचा व्याख्यान कार्यक्रम होणार आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवजयंती चे अध्यक्ष बालाजी बोंडगे यांनी केले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या