19.3 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

संत सेवाभाया हे मानवतावादी संत -विठ्ठल चव्हाण

संत सेवाभाया हे मानवतावादी संत -विठ्ठल चव्हाण

संत सेवालाल यांची जयंती मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या उपस्थितीत साजरी

परळी

राष्ट्रसंत सेवाभाया महाराज हे मानवतावादी संत असून त्यांच्या अनुयायांनी मानवी हक्क अधिकारांचे संवर्धन करण्यासाठी संघर्ष करावा असे प्रतिपादन गोर सेनेचे नेते अमरावती विभाग उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांनी केले
संत सेवाभाया यांच्या २८५व्या जयंतीनिमित्त परळी येथील शक्तीकूंज वसाहतीतील श्रीराम मंदिर येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड, तर प्रमुख पाहुणे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये , उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, राजीव रेड्डी, उदार,कल्याण अधिकारी शरद राठोड ,सुशील राठोड ,कुंदन राठोड, सुरक्षा अधिकारी बी आर अंबाड, कुलकर्णी,बालाजी पवार, सेवानिवृत्त वि. के पवार आदी प्रमुख उपस्थिती होती
विठ्ठल चव्हाण पुढे म्हणाले की, संत सेवाभायांनी निसर्गाचा तसेच पशुसंवर्धनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संदर्भ लावला.मानवी हक्क अधिकारांचे साठी संघर्ष करावा. वर्तमान परिस्थितीत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे.
मान्यवर होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी तर आभार जूनियर केमिस्ट प्रसाद जाधव यांनी मानले.
त्यावेळी महिला पारंपरिक वेशात उपस्थित होत्या . महिलनी पारंपरिक बंजारा गीतांचे गायन , नृत्य सादर केली.युवक -युवती पदाधिकारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या