20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

साखर कारखान्यातून पळवलेली मोटर सायकल चोर LCB ने पकडला

साखर कारखान्यातून पळवलेली मोटर सायकल चोर LCB ने पकडला

बीड : प्रतिनिधी

दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी गणेश यशवंत उजगरे रा. लोणगाव ता. माजलगाव हे जय महेश साखर कारखाना पवारवाडी, ता.माजलगाव येथील पार्किंग मध्ये त्यांची मोटर सायकल हिरो होंडा प्लस क्र. MH44H9267 लावून कारखान्यात इलेक्ट्रिक विभागात कामाला गेले. दुसऱ्या दिवशी शिफ्ट संपल्यानंतर पार्किंग मध्ये लावलेली मोटरसायकल पाहिली असता पार्किंग मध्ये मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी ईतरत्र शोध घेतला ती मिळून न आल्याने त्यांनी पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण येथे रीतसर फिर्याद देऊन गु र.नं.12/2024कलम.379 भादवी प्रमाणे दाखल केला. आज दिनांक 16/02/2024 रोजी सदरची मोटरसायकल विक्री करण्यासाठी इसार पेट्रोल पंप तेलगाव येथे यातील आरोपी येणार असल्याची पक्की बातमी एल.सी.बी. पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचला असता मोटरसायकल घेऊन दोन ईसम आले व पोलिसाच्या जाळ्यात आडकले.त्यांना त्यांचे नाव,गांव विचारले असता 1) रोहन पांडुरंग गायकवाड रा. कल्याण नगर,माजलगाव व 2) लखन आश्रूबा मेंढके राहणार सिरसाळा असे सांगितले त्यांना मोटरसायकलच्या कागदपत्रा बाबत विचारणा केली असता कागदपत्र नसल्याने व पोलिसांचे जाळ्यात आडकडल्याचे लक्षात आल्याने त्यांची बोबडी वळू लागली. चौकशी आंती त्यां दोघांनी मोटरसायकल चोरल्या चे त्यांनी कबूल केल्याने व निष्पन्न झाल्याने त्या दोघांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी श्री.नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक बीड, श्री.संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली PSI राडकर,Asi तुळशीराम जगताप,पोलीस हवालदार पी.टी.चव्हाण,राहुल शिंदे , पोना हंगे, पोकाँ.राठोड चालक Asi जायभाय यांनी केली आहे. सदर कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या