19 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

क्रांतिसिंह विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

क्रांतिसिंह विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

येल्डा:प्रतिनिधी

येल्डा ता.अंबाजोगाई येथील क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.विवेक गंगणे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.अभिजीत सर्वज्ञ सर प्राथमिक आरोग्य केंद्र येल्डा हे होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीस पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.विद्यालयातील विद्यार्थीनींनी महाराष्ट्र गीत सादर केले. नंतर प्रमुख पाहुणे डाॅ.अभिजीत सर्वज्ञ सरांचा सन्मान मुख्याध्यापक विवेक गंगणे सरांच्या हस्ते करण्यात आला तर मुख्याध्यापक विवेक गंगणे सरांचा सन्मान श्री.देशपांडे सरांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा आपल्या प्रभावी भाषणांतून देऊन पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.
प्रमुख पाहुणे डाॅ.अभिजीत सर्वज्ञ सरांनी शिवाजी महाराजांची जीवनगाथा सांगताना जिजाऊंनी शिवरायांच्या बालमनावर कसे संस्कार केले व स्वराज्य निर्माण करण्यासाठी कसे प्रेरित केले त्याचा सविस्तर इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.ज्याप्रमाणे शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापनेचे ध्येय पूर्ण करून दाखवले तसेच आपणही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे.
मुख्याध्यापक विवेक गंगणे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवरायांप्रमाणे सतत कार्यरत राहून आपले ध्येय साध्य करता येईल. असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.कार्यमाच्या शेवटी शिवजयंती निमित्य विद्यालयात आयोजित मातीपासून किल्ले तयार करण्याच्या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मेढे सरांनी केले तर आभार प्रकाश सुर्यवंशी सरांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विवेक गंगणे सर,जोशी सर,वाघ सर,मेढे सर,देशपांडे सर,सुर्यवंशी सर,जगदीश क्षीरसागर सर,मोरे सर,जोगदंड सर,भालेकर सर,अरूण जाधव,भागवत मोरे यांनी परिश्रम घेतले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या