शिवजयंती निमित्त रायगड प्रतिष्ठान आयोजित
रक्तदान शिबिरात 227 रक्तदात्यांचे रक्तदान
पत्रकार दिनकर शिंदे यांचे 23 व्या वेळी रक्तदान
गेवराई ( प्रतिनिधी) देशभरात शिव जनमोत्सव उत्साहात साजरा झाला. शिव जयंती निमित्त गेवराईत रायगड प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबारत तब्बल 227 जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे ज्येष्ठ पत्रकार दिनकर शिंदे यांनी गरजू रुग्णांसाठी 23 व्या वेळी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. याबद्दल त्यांचा रायगड प्रतिष्ठानकडून यथोचित गौरव करण्यात आला.
रायगड प्रतिष्ठान गेवराई च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त शास्त्री चौक येथे रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आली होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास सर्व शिवभक्तांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शहरातील महिला व पुरुषांसह तब्बल 227 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यावेळी रक्त साठवणूक करणाऱ्या पिशव्या संपल्याने अनेकांना रक्तदान करता आले नाही. सर्व रक्तदात्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर शिंदे यांनी 23 व्या वेळी रक्तदान केले. यापूर्वी 12 जानेवारी 2023 रोजी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त त्यांनी 22 वेळी रक्तदान केले होते. त्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रायगड प्रतिष्ठानचे रोहित पंडित, महेश दाभाडे, राजेंद्र मोटे, सचिन मोटे, ऍड स्वप्नील येवले, यशवंत पाटील, कृष्णा मुळे, गोपाल मोटे, रंजित सराटे, मनोज टाक, माऊली बेदरे, पत्रकार विनोद नरसाळे, पत्रकार अंकुश आतकरे, कॅप्टन गिरी, हरेशसेठ मंघारमानी, धनंजय बेदरे, राम चौधरी, संदीप साळवे, माऊले व्हरकटे, रवी दहिवाल, गणेश मोटे, फहाद चाऊस, मुख्तार कुरेशी, परमेश्वर घोडे, महादेव काळे, राजेश टाक, संदीप पवार, रितेश बजाज, अमर वाधवाणी, दत्ता मोटे, विठ्ठल मोटे, संजय पाडुळे आदींची उपस्थिती होती.
जीवनदायी ब्लड बँक बीड च्या बाळासाहेब पवार यांच्या टीमने रक्तदात्यांसाठी योग्य नियोजन केले होते. दरम्यान आयोजित शिवजन्मोत्सव व रक्तदान शिबिरास अनेक नागरिक लोकप्रतिनिधी व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.