🔶दादेगांव येथे पावने दोन कोटी रूपयांच्या बंधाऱ्याचे आ. आजबेंच्या हस्ते उद्घाटन
🔶पाणी आणि वीज हे शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न
🔶आ. बाळासाहेब आजबे यांचे प्रतिपादन
🔶आष्टी (प्रतिनिधी) वीज आणि पाणी हे शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत. वीज असेल आणि पाणी नसेल तर वीज असुन उपयोग होणार नाही. वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळेच मतदार संघातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जवळपास 110 कोटी रूपयांचे बंधारे मतदार संघात होत आहेत. त्याच बरोबर विजेचा प्रश्नही मार्गी लागत आहे. असे प्रतिपादन आ. बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
तालुक्यातील दादेगांव येथे 1 कोटी 69 लाख रूपये किंमतीच्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाच्या उध्दघाटन प्रसंगी आ. आजबे बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, माजी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव राऊत, माजी जि. प. सदस्य शिवाजीराव नाकाडे, माजी सभापती संतोष गुंड, धैर्यशील थोरवे, यश आजबे, नगरसेवक नाजिम शेख, सरपंच दादा निंबाळकर, हरीभाऊ दहातोंडे, अभियंता काकडे, गुत्तेदार कर्डीले सह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. आजबे म्हणाले की, आष्टी विधानसभा मतदार संघ पाणीदार करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आज पर्यंत मतदार संघातील बंधाऱ्यांच्या कामाला जवळपास 110 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला असुन काही बंधाऱ्यांचे प्रगीती पथावर आहेत तर काही बंधारे पुर्णत्वास गेले आहेत. मतदार संघातील मोठ्या नद्यांवरील पाणी बंधाऱ्यांच्या साह्याने आडवले तर बंधाऱ्याच्या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होत आहे. पाण्यात बरोबरच मतदार संघातील विजेचा प्रश्न देखील सोडवला जात. नविन सबस्टेशन करण्याबरोबरच जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढवून शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीज मिळावी या साठी प्रयत्न शिलट आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील वीज जोडणी अधिकृतपणे घ्यावी. कनेक्शन वाढले तर ट्रांसफार्मरची संख्या वाढेल आणि विजेचा प्रश्न देखील सुटेल. वीज बीलेदेखील भरावेत असेही आवाहन आ. बाळासाहेब आजबे यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमाला सरपंच भरत विधाते, मुरलीधर इथापे, कैलास मामा, पंडित काका, शांतीलाल पोकळे, परमेश्वर गिते, भागीनाथ विधाते, शरद कोहक, बाबासाहेब खोटे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.