*🔶परळीत २५ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेला येणाऱ्या वाहनांना रस्ता रोकोचा अडथळा होणार नाही !*
*🔶_न्याय हक्कांसाठी लढणाऱ्यांना आमचा पाठिंबा: मनोज जरांगे-पाटील यांनी दिले आश्वासन_*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…..
येत्या 25 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद होत आहे. या परिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव परळी मध्ये दाखल होणार आहेत. मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी दि. 24 फेब्रुवारीपासून गावागावात रस्ता रोको आंदोलनाची हाक दिलेली आहे. या अनुषंगाने ब्राह्मण ऐक्य परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी शिष्टमंडळासह आज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी तुमचा लढा न्याय हक्कासाठी आहे त्याला आमचा पाठिंबा असल्याचे सांगून महाराष्ट्रातून ब्राह्मण ऐक्य परिषदेसाठी परळीत येणाऱ्या वाहनांना रस्ता रोको आंदोलनाचा अडथळा ठरणार नाही असे ठोस आश्वासन मनोज जरांगे-पाटील पाटील यांनी दिले आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाचवेळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल असा इशारा दिलेला आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय ब्राह्मण परिषदेचे स्वागताध्यक्ष परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी शिष्टमंडळासह मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली व त्यांना या ऐक्य परिषदेबाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली.दि. 25 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ येथे होणाऱ्या ब्राह्मण ऐक्य परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज बांधव येणार आहेत.यासंदर्भात बोलतांना मनोज जरांगे-पाटील यांनी ब्राह्मण समाज बांधव हे न्याय हक्कांसाठी लढत आहे. त्यामुळे ऐक्य परिषदेला येणारांना आमच्या आंदोलनाचा अडथळा ठरणार नाही असे ठोस आश्वासन मनोज जरांगे-पाटील पाटील यांनी दिले आहे.यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह दिलीप जोशी,शैलेश कुलकर्णी, जितेंद्र नव्हाडे आदी उपस्थित होते.