19 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

‘आर्टिकल 370’ ची बॉक्स ऑफिसवर जादू;

‘आर्टिकल 370’ ची बॉक्स ऑफिसवर जादू;

अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिचा ‘आर्टिकल ३७०’ चित्रपट (Article 370 Film) नुकताच २३ फेब्रुवारीला रिलीज झालेला आहे. (Bollywood) चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांची चर्चा सुरू होती. या चित्रपटासोबत विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आणि अर्जुन रामपालचा (Arjun Rampal) ॲक्शन चित्रपट ‘क्रॅक’ (Crakk Movie) ही रिलीज झाला आहे. यातील एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. तर दुसरा चित्रपट संथ गतीने कमाई करीत आहे. दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पहिल्या विकेंडला कशी कमाई केली आहे, जाणून घेऊया…

२०१९ मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू- काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवला होता. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे कौतुक फक्त समीक्षकांनीच नाही तर, चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणावर केले आहे. नुकतंच चित्रपट ट्रेड ॲनालिस्ट सॅकल्निकने चित्रपटाच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटाच्या कमाईचा आलेख चढताच दिसत आहे. यामी गौतमच्या ह्या ‘आर्टिकल ३७०’ बहुचर्चित चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर एकूण २३ कोटींची कमाई केली आहे

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या