जन्म नोंदनी प्रमाणपत्रासाठी घर पट्टी, नळ पट्टी वसूलीची सक्ती करू नका – बहादूरभाई
न.प.मुख्याधिकाऱ्याला परळी शहर काँग्रेसचे निवेदन
परळी : अमोल सूर्यवंशी
परळीतील नागरिक आपल्या पाल्यांचे जन्म नोंदनी प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी मालमत्तेवरील घरपट्टी, नळपट्टीची थकबाकी भरणे नगरपालिकेने बंधनकारक केले आहे ती सक्तीची वसुली आपल्या कार्यालयाने त्वरित थांबून जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र पाल्यांना द्यावे अशी मागणी परळी शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सय्यद हनिफ सय्यद करीम (बहादुर)व त्यांच्या शिष्टमंडळाने न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत परळी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परळीतील नागरिक आपल्या पाल्यांचे जन्म नोंदनी प्रमाण पत्र साठी अर्ज करीत आहेत, त्यांना त्याच्या मालमत्तेवरील थकबाकी भरणे बंधनकारक आपले कार्यलयाने केलेआहे.
सध्या शाळेत मुलांचे अॅडमिशन चालू होत असल्याने जन्म नोंदनी प्रमाणपत्राची पल्याना आवश्यकता असल्याने आपण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाहीत, काही गोर-गरीब लोक आहेत त्यांच्या कडे पैसे नसल्याने त्यांचे मुलांचे जन्म प्रमाणपत्र आपण देत नसल्याने त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान आपण करू शकत नाहीत, आपणास वसूली साठी आणखीन दूसरे पर्याय आहेत.त्यानुसार वसूली करावी किंवा जो पैसे भरू शकत नसल्यास त्याच्या कडून तो काही दिवसानी भरेल असे लेखी घेऊन त्यांना जन्म नोंदनी प्रमाणपत्र अदा करावे अशी काँग्रेस पक्षाची या निवेदन द्वारे आपल्याकडे मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाने दिलेल्या या नियोजनाची तात्काळ दखल घेऊन जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र देऊन पाल्यांना सहकार्य करावे अशीही विनंती या नियोजनाद्वारे शहराध्यक्ष सय्यद हनिफ सय्यद करीम (बहादुर) यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष एतेशम्म खातीब, वैजनाथ गाडेकर, प्रवक्ते बद्दर भाई, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष दीपक शिरसाट, विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख, युवक अध्यक्ष अलीम भाई,अमजद भाई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष रसूल खान आधी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.