*नवी दिल्ली मॅरॅथॉन स्पर्धेत कू. आश्विन जाधव हिला सुवर्ण पदक…*
सिरसाळा (अतुल बडे):- असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेस आणि अपोलो टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने “अपोलो टायर्स नवी दिल्ली मॅराथॉन” चे आयोजन दि. २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. या मॅराथॉन स्पर्धाचे आंतर ४२ की. मि. होते. श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालय सिरसाळाच्या *कू. आश्विन जाधव* (बी एस सी द्वितीय वर्ष) या मुलीने हे आंतर ०२:५२:२५ मिनिटात पूर्ण करून सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) पटकाविले.
या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूस अपोलो टायर्सच्या वतीने रोख १,००,०००/- रूपये व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आले.
तीच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम साहेब, सचिव, प्रा योगेश भैय्या कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.