21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष, मौलाना इलियास खान फलाही यांचे मुस्लिमांना आवाहन – देशवासियांना रमजानचा संदेश पोहोचवा

जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष, मौलाना इलियास खान फलाही यांचे मुस्लिमांना आवाहन – देशवासियांना रमजानचा संदेश पोहोचवा

परळी प्रतिनिधि: जमात-ए-इस्लामी हिंद (JIH), महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी रमजानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभी रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि मुस्लिम समुदायाला रमजानचा संदेश देशवासियांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे.

रमजानच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मौलाना इलियास खान फलाही म्हणाले, “अलहमदुलिल्लाह, आज संध्याकाळपासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे आणि मी सकल मुस्लिम समुदायाला व माझ्या सर्व देशबांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वशक्तिमान अल्लाहची आपल्या सर्वांवर कृपा असो. रमजान हा आपल्या वैयक्तिक जीवनात, कुटुंबात, समाजात आणि संपूर्ण जगामध्ये गहन परिवर्तनाचा आणि सुधारणांचा काळ आहे. आपण आत्मशुद्धीसाठी प्रयत्न करूया आणि उपवास, प्रार्थना याद्वारे अल्लाहचे भय जोपासूया आणि दयाळूपणाची कृत्ये करूया. कुराण वाचणे, नमाज अदा करणे, जकात देणे आणि गोरगरिबांना मदत करणे यासारखी कार्ये करणे हे या महिन्यातील आवश्यक कर्तव्ये आहेत. आत्मचिंतनासाठी ही एक योग्य वेळ आहे, जिथे आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करून, आपल्या उणिवा कबूल करून त्या सुधारण्यासाठीचे प्रयत्न करूया. प्रामाणिकपणे उपवास करून, कुराणाचे पाठ करून, ते समजून घेऊन आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी योगदान देऊन आपण आपल्या निर्मात्याच्या जवळ जाऊया व त्याचे चाहते बनूया.”

JIH महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणाले, “या पवित्र महिन्यात, आपली भक्ती आणि सर्वशक्तिमान देवाशी जवळीक वाढवण्यासहच, हिंसा, छळ, जबरदस्तीचे विस्थापन आणि नरसंहाराचा सामना करणाऱ्या आपल्या सर्व बंधू-भगिनींचे देखील आपल्या प्रार्थने मध्ये स्मरण करूया. सर्वशक्तिमान अल्लाह संपूर्ण जगात शांतता नांदवो आणि गाझा, पॅलेस्टाईनच्या लोकांना तात्काळ या त्रासातून मुक्ती देवो. मुस्लिम या नात्याने, दडपशाहीचा सामना करणाऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली धार्मिक जबाबदारी आहे. सर्व मानवतेचा सन्मान व हक्क जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून अन्याय,अत्याचार, व दडपशाही विरुद्ध उभे राहिले पाहिजे. मी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला विनंती करतो की, रमजानचा संदेश आपल्या देशबांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. काही समाजकंटकांकडून आपल्या देशात इस्लाम आणि मुस्लिमांबद्दल पसरवल्या जात असलेल्या गैरसमजांवर हा प्रभावी उपाय आहे. हा महिना आध्यात्मिक समृद्धीचा स्त्रोत आहे. तो आपल्याl स्वतःला व जगाला एक चांगले स्थान बनवण्याची प्रेरणा देतो.”

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या