19.3 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

कन्हेरवाडी लघुसिंचन धरणातील पाणी कन्हेरवाडी नदीपात्रात सोडण्यात यावे व विद्युत पुरवठा तसेच राष्ट्रीय महामार्गसंबंधी विविध मागण्यांसाठी कन्हेरवाडी ग्रामस्थांचां वतीने 17 तारखेला रास्ता रोको आंदोलन

🔶कन्हेरवाडी लघुसिंचन धरणातील पाणी कन्हेरवाडी नदीपात्रात सोडण्यात यावे व

🔶विद्युत पुरवठा तसेच राष्ट्रीय महामार्गसंबंधी विविध मागण्यांसाठी कन्हेरवाडी ग्रामस्थांचां वतीने 17 तारखेला रास्ता रोको आंदोलन

🔶परळी (प्रतिनीधी)

📝कन्हेरवाडी गावामध्ये पाण्याची पातळी व पाण्याचा स्रोत अत्यंत कमी झालेला आहे.
गावातील नागरिकांना पिण्यासाठी व वापरा साठी पाण्याची अत्यंत टंचाई निर्माण झालेली आहे. गावातील पाळीव गुरे व जनावरे यांना सुद्धा पाण्याची अत्यंत पिण्यासाठी पाण्याची निकडीची गरज आहे . कडक उन्हाळा भासत असल्यामुळे नदीपात्रात सोडल्यास पाणी टंचाई निर्माण होणार नाही. नदीमध्ये पाणी सोडल्यास कन्हेरवाडी, बरोबर बँक कॉलनी ,जलालपूर, शंकर पार्वती नगर, समता नगर, जिरेवाडी, इंदपवाडी, ब्रह्मवाडी, या भागातील पाणीपातळी मध्ये वाढ होते, यांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल यासाठी कन्हेरवाडी लघुसिंचन तलाव धरणातील पाणी कन्हेरवाडी नदीपात्रात सोडण्यात यावे तसेच कन्हेरवाडी गावातील रोहित्र दुरुस्त करुन व नविन मंजुर करण्यात आलेले 5 डीपी लवकर बसवण्यात यावे व विज पुरवठा सुरळीत करावा तसेच
कन्हेरवाडी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.548 बी चे उर्वरीत काम लवकर पूर्ण करणे कन्हेरवाडी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुने नदीपर्यंत नाली बांधकाम करावे लाईट पोल बसवणे आनंद नगर भागातील हाय मास्ट दिवा सुरू करणे ह्या मागण्या संबंधित कार्यालय तसेच तहसिल कार्यालय परळी/जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्याकडे मागण्या करण्यात आल्या होता परंतु अद्याप साठवण तलावातील पाणी नदी पात्रात सोडण्यात आलेले नाही, त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे साठवण तलावातील पाणी नदी पात्रात सोडण्यात यावे करिता सर्व कन्हेरवाडी ग्रामस्थांचा वतीने 17/3/2024 तारखेला सकाळी 10 वाजता कन्हेरवाडी येथील हनुमान मंदिर जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे आवाहन कन्हेरवाडी गावचे मा.सरपंच राजेभाऊ फड व भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीरामजी मुंडे यांनी केले आहे

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या