अंबादास दानवे नाराज ?
मोठ्या भूकंपाच्या तयारीत ! शिंदे गटाच्या वाटेवर ?
जिल्ह्यात खैरे-दानवे यांचे सख्य सर्वांना ठाऊक आहे.
मुबई : वृत्तसंस्था
अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरेंना लोकसभेची उमेदवारी मिळतेय असे समजल्यावर नाराज झाले आहेत. आमच्याद वाद नाही, मतभेद नाहीत असे सांगत ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा एकदिलाने प्रचार करू असे ते म्हणाले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे दानवे नाराज झाले आहेत. दानवेंनाही लोकसभा लढवायची होती.
पक्ष फुटीनंतर दोघेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले असले तरी उभयतांमध्ये विस्तव जात नाही. लोकसभेसाठी खैरे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी ते कामाला लागले आहेत. खैरेंच्या उमेदवारीस दानवे यांचा विरोध आहे. ते स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, राज्यात प्रचारासाठी तुमची गरज असल्याचे दानवे यांना ‘मातोश्री’वरून सांगण्यात आले. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही दानवे यांची मनधरणी केल्याचे समजते.
लोकसभेला नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मी पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. माझ्यासाठी संघर्ष नवा नाही. भविष्यात काय घडेल हे आताच सांगू शकत नाही. – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते