वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती
भूकंपाचे केंद्र हिंगोलीत, ४.५ रिश्टर स्केलची नोंद
६:८ वाजेनंतर दुसरा हादरा ६:१९ वाजेदरम्यान बसला
हिंगोली :प्रतिनिधी
हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांना सकाळी ६ वाजून ८ मिनिट ते ६ वाजून २४ मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे.
तालुका प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. भुकंपाचे दोन धक्के बसत आज सकाळी जमीन हादरली. गत तीन वर्षांत अनेक वेळा भूकंपाचे धक्के या भागात जाणवले आहेत. पण हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
हादरे बसले त्यावेळी पक्षांनी किलबिलाट करणे सुरू केले. तर गोठ्यातील जनावरांनी हंबरडा फोडला. जमीन हादरताच नागरीक घराबाहेर पडणे सुरू केल.६:८ वाजेनंतर दुसरा हादरा ६:१९ वाजेदरम्यान बसला.
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, नर्सी, कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचे दोन हदरे लागोपाठ जाणवले.वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे,वापटी, परीसर भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सहा वर्षांपासून धक्का…गत पाच ते सहा वर्षा पासुन भुकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ला भुगर्भातुन जोराचा आवाज येत जमीन हादरली. आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण गुरुवार झालेल्या भुकंपाचे हादरे जाणवले.
भूकंप – भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती “भूकंप लहरी” तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात.
सिस्मोग्राफ
सिस्मोग्राफ , यंत्र जे भूकंपाच्या लहरींची नोंद करतेभूकंप , स्फोट किंवा इतर पृथ्वी हादरणारी घटना. सिस्मोग्राफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सर्ससह सुसज्ज आहेत जे जमिनीच्या हालचालींचे विद्युतीय बदलांमध्ये भाषांतर करतात, जे उपकरणांच्या ॲनालॉग किंवा डिजिटल सर्किट्सद्वारे प्रक्रिया आणि रेकॉर्ड केले जातात. सिस्मोग्राफ आणि सिस्मोमीटर हे शब्द अनेकदा परस्पर बदलून वापरले जातात; तथापि, दोन्ही उपकरणे भूकंपाच्या लहरी शोधू शकतात आणि मोजू शकतात,