करम तांड्यावर गावठी हातभट्टी दारूवर पोलीसाचा छापा..
सोनपेठ – प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील करमतांडा येथे दि.20 मार्च रोजी पोलीसांनी गावठी दारूवर व गावठी हातभट्टी दारू तयार करणा-या शेतात पोलीसांनी छापा मारला..या छाप्यात लोखंडी टाक्यात 5 हजार रूपयाची 50 लिटर दारू आणी 5 हजार 250 रूपयाचे 150 लिटर रसायन नष्ट केल्याची घटना समोर आली.रामा रूपसिंग राठोड यांच्यावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मौजे करम तांडा तालुका सोनपेठ येथील भगवान थावरू पवार यांचे शेतात जाऊन छापा मारला असता पोलिस आल्याची चाहूल लागल्याने इसम रामा रूपसिंग राठोड राहणार करम तांडा हा पोलिसांना पाहून तेथून पळून गेला. पोलिसांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता इसम रामा रूपसिंग राठोड हा भगवान थावरू पवार यांचे शेतातील मोकळ्या जागेत मानवी आरोग्यास अपायकारक असणारे रसायनापासून गावठी दारू बनवीत होता. सदर ठिकाणी एका प्लास्टिकच्या कॅन मध्ये व लोखंडी टाक्यांमध्ये 5हजार रुपये किमतीची 50 लिटर तयार असलेली गावठी हातभट्टीची दारू व 5 हजार 250 रुपये किमतीचे 150 लिटर केमिकल युक्त रसायन मिळून आले. त्यावरून पोलिसांनी तपासणी कामे आवश्यक असलेले केमिकल व गावठी दारू पंचा समक्ष जप्त करून उर्वरित गावठी दारू व केमिकल जागीच नष्ट केले. त्यानंतर पोलीस अंमलदार पौळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे रामा रूपसिंग राठोड याचे विरुद्ध पोलीस स्टेशन सोनपेठ येथे कलम 328 भारतीय दंड संहिता सहकलम 65 क महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन सोनपेठ येथील अधिकारी करीत आहेत.सदरील कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलिप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चिट्टेवार, पोलीस हवालदार कांबळे, रोडे, गजेंद्र चव्हाण, हणमंत पोळ, यांनी पोलीस स्टेशन सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षक कांबळे पोलीस हवालदार इंगळे व होमगार्ड मुलगीर यांच्या पथकाने ही कारवाई केली.