19.7 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

गडांना भेटी, नतमस्तक, पेढेतुला, पंकजाताई यांचं सर्वत्र स्वागत

लेकीला मिळाले जिल्हयातील श्रध्देय गडांचे आशीर्वाद

🔶श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, भगवान भक्तीगड, नारायणगडावर पंकजाताई मुंडे नतमस्तक

🔶सावरगावला झाली पेढेतुला

बीड :

बीड लोकसभेच्या उमेदवार तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी काल व आज जिल्हयातील श्रध्देय गडांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. जिल्हयातील जनतेच्या ऋणात नेहमी असावे, त्यांचेवरील प्रेम कधीही कमी होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. गड परिसरातील ग्रामस्थांनी देखील त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द यावेळी दिला.

लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे शुक्रवारी बीडमध्ये आल्या. धामणगांव इथं जल्लोषात स्वागत झाल्यानंतर काल रात्री त्यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर जाऊन श्रध्देय वामनभाऊ, राष्ट्रसंत भगवान बाबा, कुसळंब येथील खंडेश्वर यांचे आशीर्वाद घेतले. आज सकाळी धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावर जावून त्यांनी संत नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद घेतले. दोन्ही गडावर त्यांना महंत शिवाजी महाराज, विठ्ठल महाराज यांनी आशीर्वाद दिले.

🔶ग्रामस्थांनी दिला एकमुखी पाठिंब्याचा शब्द
गहिनीनाथ गड, सावरगाव येथे ग्रामस्थांनी पंकजाताईंचे वाजतगाजत भव्य स्वागत केले. इथं त्यांची पेढेतुलाही करण्यात आली. यावेळी संवाद साधताना त्या म्हणाल्या, प्रथा, परंपरे प्रमाणे मी गडावर आले आहे, ही परंपरा मुंडे साहेबांपासून आहे. मला उमेदवारी जाहीर झाली, मुंडे साहेबांनी सांभाळेल्या सर्वाना सांभाळण्यासाठी लोकसभा लढवण्याचा मी निर्णय घेतला.
मंत्री असताना सर्व गडांना निधी दिला, पुढेही जिल्हयाचा विकास करण्यासाठी जीवाचं रान करेल. तुमचं माझेवर खूप प्रेम आहे,हे कधीही कमी होऊ नये.अफवावर विश्वास ठेवू नका.माझे यश हे माझं नाही. तुमचं आहे. कारण तुमच्यासाठी मला काम करायचं आहे, त्यासाठी मला आशीर्वाद द्या असं पंकजाताई म्हणाल्या. यावेळी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या