गुरुकुल शाळेत होळीचा सण साईराज केंद्रे समवेत उत्साहात साजरा.
सिरसाळा :अतुल बडे
दि.23 मार्च 2024वार शनिवार रोजी “गुरुकुल प्री प्राइमरी” स्कूल मध्ये होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य निश्चल सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून “आमच्या पप्पाने गणपती आणला ” छोटा रिल्स स्टार साईराज गणेश केंद्रे आणि त्याचे कुटुंबीय व आदरणीय मुंडे सर , पालक प्रतिनिधी अतुल बडे,डॉक्टर बडे, नानाभाऊ मुंडे, शंकर भर्डे, इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली तसेच आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी होळीच्या गाण्यावर नृत्य सादर करून पालकांची मने मोहून टाकली. साईराज चे वडील गणेश केंद्रे यांनी पालकांना संबोधून लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा असे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष निश्चल सर यांनी मुलांना होळी या सणाचे महत्त्व सांगितले.शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम रघुनाथ राठोड या विद्यार्थिनीने केले व आभार प्रदर्शन शिंदे मॅडम यांनी केले.